Fri. Aug 14th, 2020

मला ठाण्यात राहण्याची इच्छा नाही – संजीव जयस्वाल.

माझ्या बदलीचे प्रयत्न केले,बिनबुडाचे आरोप झाले, आता ठाण्यात राहण्याची इच्छा नाही -आयुक्त

ठाणे, 20 फेब्रुवारी : गेल्या महिन्याभरापासून माझ्यावर गंभीर आरोप झाले, माझ्या बदलीचे प्रयत्नही करण्यात आले. आता मीच ठाणे सोडून जाणार आहे. ठाण्यात राहण्याची इच्छा नाही. येत्या एप्रिल पर्यंत जर माझी बदली झाली नाही तर मीच रजेवर जाईन असे भावुक वक्तव्य पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत केले. गेल्या तीन वर्षात न होणारे विकास कामे  ठाण्यासाठी केले त्याची हीच पोचपावती का? असा सवाल करीत माझ्या विरोधात अविश्वासाचा ठराव करा असे उद्गार काढताच काही काळ सभागृह स्तब्ध झाले.

भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलेल्या पत्रामुळे मुंब्रा येथील स्टेडियमचे काम रखडले असे म्हणत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत महासभेत गोंधळ घातला. महासभेतच घोषणाबाजी करीत फलकही झळकावले. राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजप आमदार आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सज्जड दमच देत कारवाईचा इशारा दिला. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून आयुक्त,पालिका प्रशासन विरुद्ध भाजप नगरसेवक असे शीतयुद्ध सुरु होते. सभागृहात आणलेल्या प्रस्तावाला भाजप नगरसेवक विरोध करीत होते. भाजप आमदाराच्या पत्राचे वाचन आणि प्रत मिळावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. यावर संतप्त स्वतः पालिका आयुक्त यांनी सभागृहात निवेदन केले.  संजीव जयस्वाल यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले . त्यानंतर गेल्या तीन वर्षात त्यांनी ठाण्यात अनेक मोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प राबवाले . मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आपल्यावर व्यक्तिगत स्वरूपातील आरोप करण्यात येत असून असल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले . जयस्वाल यांच्या विरोधात व्हायरल झालेल्या वादग्रस्त क्लिपमुळे देखील ते कमालीचे व्यथित झाले होते . अखेर मंगळवारी झालेल्या महासभेत त्यांनी स्वतःहून जाण्याची इच्छा दर्शवली असून माझ्यावर अविश्वास ठराव आणा असे आवाहन त्यांनी सभागृहात केले

204 Views
Shares 0