Sat. Oct 24th, 2020

ठाण्यात ३५३ तळीराम चालकांवर कारवाई.    

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी होळी-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विशेष कारवाईत तळीराम चालकांवर कारवाई करून रंगाचा बेरंग करण्यात आला.

मागील दोन दिवसात तब्बल 353 तळीराम चालकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल सव्वा चार लाख दंड वसूल केला अशी माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी विविध नाक्यांवर तपासणी मोहीम राबवली होती. या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभाग,स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या तावडीत 353 मद्यपी चालक सापडले. या मोहिमेत बुधवार ते गुरुवार मध्यरात्रीपर्यंत 56 मद्यपी, तर शुक्रवारी धुळवडीदिवशी सायंकाळपर्यंत सर्वाधिक 297 तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यानुसार,एकूण 353 मद्यपी चालकांवर कारवाई करून 4 लाख 18 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत सतेरे यांनी दिली.

254 Views
Shares 0