Thu. Jan 28th, 2021

दिवसाढवळ्या तसेच रात्री घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरांना अटक – तब्बल ११ गुन्ह्यांची उकल.

ठाणे : प्रतिनिधी

भर दिवसा आणि रात्रीच्या अंधारात बंद घरात घुसून घरफोडी आणि दुकान फोडीच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली होती. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीसांच्या पथकाने शोध मोहिमेत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण परिमंडळ-१ च्या पोलीस पथकाने दोघांना अटक करून त्यांनी केलेल्या ११ गुन्ह्यांची उकल केली आहे. ११ गुन्ह्यातील सोन्याचा आणि चांदीचा ऐवज असा १७ लाख ६६ हजार रुपयांचा ऎवजही यावेळी जप्त करण्यात आला आहे.

वाढत्या घरफोडी आणि दुकानफोडी यांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीसांनी कंबर कसली आहे. ठाणे पोलीसांनी परिमंडळ -१ च्या शोध पथकाद्वारे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितींचा आधार घेऊन सराईत घरफोडे आरोपी अबरार अकबर शेख(२१) रा. नागपाडा, मुंबई आणि आरोपी रमजान गालिब शेख (२७) रा. बाबानगर, खडवली(पु) यांना अटक केली आहे. पोलीसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी कळवा, ठाणे, मुंब्रा, उल्हासनगर, डोंबिवली परिसरात केलेल्या तब्बल ११ घरफोड्यांच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. या ११ गुन्ह्यात तब्बल १७ लाख ६६ हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा आणि चांदीच्या दागिन्यांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात १४ लाख ७३ हजार रुपयांचे ५०० ग्राम सोने, आणि ५४० ग्राम चांदीचे २ लाख ९३ हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकार परिषदेत दिली.
#Thane #ThanePolice #Crime #Arrested #ThaneLive

1486 Views
Shares 0