Sat. Oct 24th, 2020

मोटार बाईक ऍम्ब्युलन्स लवकरच ठाण्यात सेवा देणार – आरोग्यमंत्री दीपक सावंत.

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या #मोटार_बाईक_ॲम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला . आज नव्याने आणखी २० मोटार बाईकचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत २ ऑगस्ट २०१७ पासून #मोटार_बाईक_ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत १० बाईक ॲम्ब्युलन्स समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
आता या सेवेत  आणखी २० बाईक ॲम्ब्युलन्सचा समावेश करण्यात आला.

१०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर बाईक ॲम्ब्युलन्स तत्काळ उपलब्ध होऊन प्राथमिक उपचार केले जातात. बाईक ॲम्ब्युलन्स चालविणारे सर्व प्रशिक्षित डॉक्टर आहेत. तसेच त्यांच्यासोबत आवश्यक औषधे, श्वसनमार्गावरील उपचारासाठी लागणारी व इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतात.

मुंबईत #मोटार_बाईक_ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे २६०० लोकांवर उपचार करण्यात आला आहे. आता मुंबईबरोबरच या बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर, नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

463 Views
Shares 77