Mon. Oct 26th, 2020

नौपाड्यात खंडणी स्विकारताना एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

नौपाड्यात खंडणी स्विकारताना एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

ठाणे लाईव्ह :- अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रार न करण्यासाठी नौपाडा येथील एका व्यावसायिकाकडून एक लाखांची खंडणी स्वीकारणाऱ्या समीर महाजन याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. समीर आणि त्याचा साथिदार बंटी सिंग यांनी व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.त्याबाबतची तक्रार नौपाडा पोलिसात करण्यात आली होती.

नौपाडा येथील विष्णुनगर भागात तक्रारदार व्यावसायिक हसमुख शाह हे राहतात. त्यांचे एकदंत इमारतीतील कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत समीर आणि त्याच्या साथिदाराने 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. रक्कम दिली नाही तर,गायब करण्याची धमकी या दोघांनी दिली होती. शाह यांनी याप्रकरणाची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. शुक्रवारी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.लब्दे यांच्या पथकाने सापळा रचून 1 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना समीरला रंगेहात पकडले. ठाणे न्यायालयाने 16 फेब्रु.पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

1958 Views
Shares 0