
ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.
शिक्षणाधिकार्यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन.
प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिमा दिली भेट.
ठाणे, दि. १३ (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात नोकर्या गमावलेल्या पालकांकडून बळजबरी जाचक फी वसूल करणार्या शाळांप्रश्नी मनसेने आज शिक्षणधिकार्यांच्या दालनात ठिय्या देत आंदोलन केले. यावेळी निद्रिस्त प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिमा महाराष्ट्र सैनिकांनी भेट दिली. शिक्षण विभागाला १५ दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले असून पालकांचे प्रश्न मार्गी न लावल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन प्रत्येक शाळांबाहेर तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा शिक्षणधिकार्यांना महाराष्ट्र सैनिकांनी दिला.
लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असून आॅनलाईन वर्ग सुरु आहेत. माञ तरीही खासगी शाळा पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत. या प्रश्नी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील सतत शिक्षणधिकारी शेषराव बडे यांच्यासोबत पञव्यव्हार करत होते. तर खासगी शाळांच्या पालकांच्या तक्रारी मनसेचे स्वप्निल महिंद्रकर
यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग ठोस कारवाई करत नसल्याने आज मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील व मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या कार्यालयात पालकांसह ठिय्या मांडला. शिक्षण विभाग झोपला असून मनसेने बडे यांना दिली कुंभकर्णाची प्रतिमा भेट. यावेळी मनविसे उपशहरअध्यक्ष दीपक जाधव, सचिव सचिन सरोदे, विभागअध्यक्ष अनिल सुर्यवंशी, विजय दिघे, सिध्देश घाग, उपविभागअध्यक्ष अक्षय मोरे, सागर वर्तक, मनविसे शाखाध्यक्ष रुपेश झांजे उपस्थित होते. पुढील १५ दिवसात शाळा आणि शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन प्रत्येक शाळांबाहेर तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा शहराध्यक्ष किरण पाटील यांनी दिला.
More Stories
आठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.
कोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.