Sat. Oct 24th, 2020

“हम पांच” एक सेलिब्रेशन!

खरं तर या नाटकात कोणी सेलिब्रिटी नाही, किंवा कोणी मोठा कलाकार नाही, पण हे नाटक स्वतःच एक सेलिब्रेशन आहे…
या नाटकातल्या बायका आपल्यातल्याच आहेत..
जेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम सतावतो.. तेव्हा असं वाटतं की अरे हा तर आपलाच प्रॉब्लेम आहे,
त्यामुळे जेव्हा त्या खुश होतात तेव्हा आपणही मनापासून हसतो.. त्या त्यांचं दुःख सांगतात तेव्हा आपणही मनातून हळवे होतो.. सारखं वाटत रहातं की आपण यातल्या प्रत्येक पात्राला ओळखतो.

आणि आता ही ओळख वाढवण्यासाठी हे नाटक पुन्हा बघावसं वाटतंय

त्यामुळे प्रत्येकाने हे नाटक एकदा नक्की बघावं.. पण हा. एकदा बघितलत ना.. तर तुम्ही पुन्हा बघणार ही गॅरंटी, कारण हे नाटक म्हणजे नशा आहे.. जो गारूड करतोच…

ठाणे लाईव्ह टीम.

 

 

 

213 Views
Shares 127