Mon. May 23rd, 2022

१६ अनधिकृत हॉटेल्सवर बुलडोझर, कोठारी कंपाउंड मधील बार, हुक्का पार्लर सील, आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई.

ठाणे :- कोठारी कंपाऊंडमधील अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर, लाऊंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण ६ आस्थापना आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या. दरम्यान शहरातील जवळपास १० अनधिकृत हॉटेल्सवर बुलडोझर चालविण्याची कारवाई आज महापालिकेच्यावतीने करण्यात आली.

महापालिकेच्यावतीने पोलिस बंदोबस्तात आज सकाळी १० वाजता या कारवाईस सुरूवात करण्यात आली. यामध्ये अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कोठारी कंपाऊंडमधील एमएच४ पब आणि बार, डान्सिंग बॉटल पब, लाऊंज १८ बार, व्हेअर वी मेट, बार इन्डेक्स हे हुक्का पार्लर्स सील करतानाच या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले.

नौपाडा प्रभाग समितीतंर्गत आज सकाळपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये पुरेपूर कोल्हापूर, साईकृपा या हॉटेल्सच्या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले. तर एक्स्पिरियंस हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला. त्याचबरोबर मल्हार सिनेमा येथील दुर्गा बार आणि रेस्टॉरंट तसेच जांभळी नाका येथील अरूण पॅलेस बार अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने सील करण्यात आले.

दरम्यान रामचंद्रनगर येथील जयेश हा लेडीज बार पुर्णत: जमीनदोस्त करण्यात आला तर उथळसर येथील फुक्रे बारसह इतर ३ रेस्टॉरंटसवर कारवाई करण्यात आली.

22801 Views
Shares 0