Fri. Jan 21st, 2022

कुस्ती पैलवांनाची आखड्या मागची संघर्ष कथा

कुस्ती हा खेळ महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा आहे, वर्षानुवर्षे हा खेळ आपला पारंपरिक वारसा जपत आहे , क्रीडा रसिकांना मनोरंजनाचा आनंद देत असतो , ग्रामीण भागा मध्ये तर कुस्ती हा खेळ जीव की प्राण …आता ग्रामीण भागाचे पण शहरीकरण होत आहे .. त्या मुळे कुस्ती चे वेड शहरी भागा मध्ये पण पसरत चालले आहे , कुस्ती ला आता ग्लॅमर येत चालला आहे , मधल्या काळात झाकला गेलेला हा खेळ परत उभारी घेत आहे , त्यावर आता चित्रपट ही बनू लागले आहेत आणि जोरदार कमाई सुद्धा करत आहे , ह्या कुस्ती मध्ये खेळणारा पैलवान एखाद्या राजबिंडा पेक्षा कमी लोकांना वाटत नाही , काय त्याचा रुबाब आणि अंदाज असतो , त्याला मिळणारा तिथे मानसन्मान नक्कीच डोळ्याचं पारणे फेडणारा असतो , सर्व सामन्यांना वाटत असेल काय आनंदी आयुष्य जगतो हा पठ्ठा ! पण आपण त्यांची फक्त एक बाजू बघत असतो, इथं पर्यंत त्यांना करावा लागलेल्या प्रवासाची खडतर कहाणी आपल्या कानावर सहसा पडत नाही , आणि प्रसिध्द कुस्ती पैलवान झाल्या नंतर सुद्धा त्यांना ज्या हालअपेष्टा, सहन कराव्या लागतात ,किती तरी प्रश्नांना सामोरे जावे लागते , कुटुंबाची चिंता पण मागे लागून असते, ह्या गोष्टी आपल्या पर्यंत येत नाहीत .
कुस्ती हा आंतरराष्ट्रीय खेळ झाला आहे , देशाचे नाव मोठे करायला हे कुस्ती पैलवान जीवाचे रान करत असतात पण त्यांना तेवढिच मदत ह्या देशाच्या सरकार कडून मिळते का , ज्या प्रकारे इतर देशामध्ये त्यांच्या खेळाडूंना सरकार चे पाठबळ असते तसे पाठबळ आपल्या खेळाडूंना मिळते का , त्या मध्ये सुद्धा महाराष्ट्रा मधील पैलवान ची परिस्थिती अजून बिकट आहे , जसा पंजाब हरियाणा मध्ये सरकारचा , समाजाचा आणि कुटुंबाचा आर्थिक -मानसीक पाठिंबा त्यांना मिळतो तसा आपल्या खेळाडूंना मिळत नाही, आज महाराष्ट्राची शोकांतिका आहे की ज्या महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी पहिले ऑलिम्पिक मेडल देशाला मिळवून दिले त्या महाराष्ट्रालाआज देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मागील किती तरी वर्ष मिळू नये ? कुस्तीसाठी जो व्यायाम आणि शारीरिक मेहनत घ्यावी लागते त्यात आपलं पठ्ठे कुठेच कमी नाहीत पण त्यांना मुख्य प्रश्न आहे आहार ! आणि त्या आहारासाठी येणारा खर्च !आधी सांगितल्या प्रमाणे कुस्ती चा उगम हा ग्रामीण आहे , कुस्ती पैलवान हे ग्रामीण भागातून येतात , लहान लहान मुले सुद्धा तालमीत भरती होतात , पण त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते , आई वडील शेती वर उदरनिर्वाह करतात , शेतीमधून गेल्या काही वर्ष बघता चांगली उत्पन्न येत नाही , त्यामुळे तालीम साठी पैसे पाठवणे अवघड झाले आहे , त्याची चिंता आणि दडपण बिचाऱ्या पैलवाना वर येते , योग्य आहार नाही भेटला तर पुढे काई होणार यांची चिंता सतावते , आपले तरुणपण त्यांनी दावणीला बांधलेले असते , ज्यावेळी इतर त्यांच्या वयातील मुले कॉलेजला जात असतात तेव्हा ही मुले आपली परंपरा जपण्यासाठी आणि देशाचं नाव , मातीचे नाव रोशन करण्यासाठी रात्रदिवस झटत असतात, पण माणूस म्हटले की मन आले , आणि आर्थिक चणचण भासू लागली की मनात नकारात्मक विचार येऊ लागतात, मग त्याचा परिणाम कुस्ती वर होऊ शकतो

यामध्ये सरकार चांगली भूमिका बजावू शकते आणि ह्या समस्या सोडवण्यात सहकार्य करू शकते ,
खालील प्रमाणे काही समस्या दिल्या आहेत , व त्यांचे उपाय ही सांगितले आहेत

-स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत सुद्धा पहिलवांनासाठी काही जागा राखीव ठेवा , म्हणजे जसा फेऱ्या सलग तीन महाराष्ट्र केसरी झालेल्या विजय चौधरीला सरकारी नोकरीसाठी माराव्या लागल्या तसा इतरांना माराव्या लागणार नाही .

– आज पर्यंत किती तरी राज्य स्तरीय कुस्ती खेळणाऱ्यांना दुखापत झाली आहे , त्याचा त्यांना आलेला खर्च, आणि किती खेळाडूंना योग्य उपचार न मिळाल्या मुळे किंवा उपचारासाठी लागणारा खर्च पेलण्याची क्षमता नसल्यामुळे मुलांना कुस्ती अर्ध्या मध्येच सोडुन द्यावी लागली . त्यासाठी सरकारकडून त्यांची विमा पॉलिसी काढण्यात यावी.

– किती तरी कुस्ती पाहिलवानांना ऐन तरुण पणात कुस्ती मधेच सोडून द्यावी लागते कारण घरची परिस्थिती बेताची असते आणि कमवून आणून देणारा कोणी नसतो. त्यासाठी सरकार ने त्यांचा कुस्ती खेळेपर्यंत राहण्याचा आणि खाण्याचा खर्च करावा , असा किती तरी पैसे सरकारचे नको त्या ठिकाणी वाया जातात , थोडा पैसे सामाजिक खेळासाठी लावला तर काही होत नाही .

-कुस्ती खेळण्याचा एक ठराविक वय असते , त्यानंतर पुढे काई असा प्रश्न त्यांना सतावत असतो , आपला आणि आपल्या परिवाराचा गुजारा कसा करायचा अशी चिंता त्यांना सतावत असते , त्यासाठी त्यांना सरकारी किंवा सरकारी कंपन्या मध्ये त्यांना नौकरी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल याची हमखास हमी देईल अशी तरतूद केली पाहिजे.

– समाजा मधून पण जर काही मदतीचे हात पुढे आले तरी मोलाची भर पडू शकते , प्रत्येक ग्रामपंचायतीने, आमदार , खासदारा ने जर एक एक पैलवान दत्तक घेतला तरी काम होऊ शकते.

39422 Views
Shares 17