Mon. May 23rd, 2022

ठाणे:- जिजामाता नगरमध्ये विना फायर परवाना ४४२ कुटुंबाना राहण्यास दिल्या सदनिका. बिल्डर आणि वास्तुविशारद यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्याच्या जिजामाता नगरमध्ये बनविण्यात आलेल्या १९ माळ्याच्या इमारतीला अग्निशमन दलाचा ना हरकत प्रमाणपत्र न घेताच ४४२ कुटुंबाना सदनिका राहण्यास दिल्या. या प्रकरणी तीन विकासक आणि एक वास्तुविशारद यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोमवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी जिजामाता नगर येथील १९ माळ्याच्या पुनर्वसित इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. दरम्यान विकासकाच्या हलगर्जीपणाची शिक्षा ४४२ कुटुंबाना का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. दरम्यान फिर्यादी अरुण मधुकर राऊत(५८) रा. विमल हाईट्स पारसिक नगर कळवा यांनी सोमवारी रात्री पुनर्वसित इमारतीचे विकासक मेसर्स अनुदान प्रॉपर्टीज प्रा. लि. विकासक मेसर्स देव लॅन्ड ऍण्ड हौसिंग प्रा. लि  चे विजय ठक्कर, विकासक मेसर्स मंगलमूर्ती इंटरप्राइझेस आणि वस्तू विशारद योगेश केळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलाम ५ (१) व नियम ७(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास वागळे इस्टेट पोलीस करीत आहे.

50227 Views
Shares 0