Fri. Jan 21st, 2022

उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकावण्याचं काम जोमाने करणार – एकनाथ शिंदे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली आहे. त्याचबरोबर शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा ठरावही मंजूर झाला आहे.

मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लॅक्समध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी  मतदान झालं. त्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याची बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड झाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की,
शिवसेना नेतेपदी झालेली निवड हे आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्याई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वास याचे फळ आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दिवसाची रात्र करून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा गड अभेद्य करण्याचे काम केले. त्या समस्त शिवसैनिकांचाही मी कृतज्ञ आहे. उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकावण्याचं काम जोमाने करणार – एकनाथ शिंदे

43799 Views
Shares 0