Mon. May 23rd, 2022

संजय रोकडे हत्या प्रकरणी पाच आरोपींना   जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजाराचा दंड.  

* तपास अधिकारी थोरवेच्या चौकशीचे पोलीस महासंचालकाना आदेश.
* २० साक्षीदार तपासले.तपासात त्रुटी.
* राजकीय दबावाने शिक्षा झाल्याचा आरोपींचा आरोप.

ठाणे : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून २२ जुलै, २०१४ रोजी ठाण्याच्या वंदना सिनेमा येथील परिसरात डोक्यात रॉड मारून हत्या करण्यात आलेल्या संजय रोकडे यांच्या हत्या प्रकरणी ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती पी आर कदम यांनी आरोपींना दोषी ठरवले. 23 जानेवारी, 2018 रोजी मंगळवारी दोषी आरोपी मंगेश देविदास जाधव, मनीष देविदास जाधव, निलेश खंडू कटाते, मनोज जयराम सोनावणे, गणेश नारायण देवाडिगा यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायमूर्ती कदम यांनी निकालात या प्रकरणाचे तपास अधिकारी मछिंद्र भिमाजी थोरवे यांच्या तपास कामावर ताशेरे ओढीत, पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती विशेष सरकारी वकील संगीत फड यांनी दिली. न्यायालयाच्या निकालाबाबत आरोपींनी राजकीय दबावापोटी निर्दोष असतानाही शिक्षा ठोठावल्याचा आरोप केला.

२२ जुलै, २०१४ रोजी ठाण्याच्या वंदना सिनेमा जवळील परिसरात संजय रोकडे यांची हत्या डोक्यात रॉड मारून करण्यात आली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आरोपी मंगेश देविदास जाधव, मनीष देविदास जाधव, निलेश खंडू कटाते, मनोज जयराम सोनावणे, गणेश नारायण देवाडिगा यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक मछिंद्र थोरवे यांनी तपासकामात सावळागोंधळ करून जाणीवपूर्वक आरोपींना फायदा होईल अशी तरतूद केल्याचा ठपका न्यायमूर्ती पी आर कदम यांनी निकालात नमूद करीत थोरवे यांच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालक यांना दिले. न्यायालयात विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी कौशल्याने न्यायालयात सरकारची बाजू मांडून तब्बल २० साक्षीदार तपासले. यात फिर्यादी जखमी जयंत भोईर यांच्यासह तीन वैद्यकीय अधिकारी, पंच यांचा समावेश होता. या हत्येप्रकरणात न्यायालयाने या पाचही आरोपीना 18 जानेवारी, 2018 रोजी दोषी ठरविले. त्यानंतर 23 जानेवारी,2018 रोजी मंगळवारी सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मंगळवारी न्यायालयात शिक्षा ठोठावल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षा सुनावल्यानंतर पाचही आरोपींना कारागृहात  रवाना करण्यात आले. यावेळी न्यायालयात  नातेवाईक आणि परिवार उपस्थित होते.

तपास अधिकारी थोरवेनी केलेल्या चुका.

* आरोपींची ओळख परेड मध्ये अनागोंदी.
* आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट काढण्यात आला नाही.
* हत्येनंतर रस्त्यावर पडलेला मृतकाचे मेंदू ही जमा करण्यात आला नाही.
* पंचनाम्यात फिर्यादी भोईर यांच्या निसान कारचा पंच नाम्यात उल्लेखच नाही.
* गुन्ह्यात वापरलेल्या मोटरबाईक मालकाचा साधा जबाबही नोंदविण्यात आला नाही.
* आरोपींना हत्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली त्या ठिकाणचा       पंचनामा केला नाही.
हत्येमागचा पूर्ववैमनस्येचा इतिहास.

सर्वप्रथम हत्येचा प्रवास हा संजय रोकडे यांच्या मित्र परिवारातील अफजल याच्या हत्येने सुरु झाली. अफजलच्या हत्येत आरोपीचा मामा अरुण गांगुर्डे याचा समावेश होता. या हत्येनंतर बदला  घेण्याच्या उद्देशाने संजय रोकडे यांनी सहकाऱ्यांसमवेत अरुण गांगुर्डे  याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातून आरोपी असलेले मृतक संजय रोकडे हे निर्दोष सुटले. तेव्हापासून संजय रोकडे आणि शिक्षा झालेले आरोपी जाधव यांच्यात वैमनस्य सुरु झाले. अखेर २२ जुलै, २०१४ रोजी संजय रोकडे याची हत्या मंगेश देविदास जाधव, मनीष देविदास जाधव, निलेश खंडू कटाते, मनोज जयराम सोनावणे, गणेश नारायण देवाडिगा यांनी केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल  प्रकरणाची अंतिम सुनावणी १८ जानेवारी रोजी करून दोषी ठरविण्यात आले आणि 23 जानेवारी, 2018 रोजी पाचही आरोपीना न्यायमूर्ती पी आर कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

राजकीय दबावाने जन्मठेपेची शिक्षा.

१८ जानेवारीला ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती पी आर कदम यांनी विशेष सरकारी वकील संगीत फड यांचा युक्तीवाद आणि सादर साक्षीपुरावे आणि तपासातील त्रुटी ग्राह्य धरीत पाच आरोपींना दोषी ठरविले. त्यानंतर २३ जानेवारी रोजी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान पाचही आरोपींनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करीत राजकीय दबावापोटी शिक्षा झाल्याचे लेखी सहीनिशी निवेदन देत निर्दोष असल्याचे सांगितले.निवेदनात पाचही आरोपींनी आम्ही कौटुंबिक असून मनीष जाधव याचे १६ मे, २०१४ रोजी विवाह झाला आणि हत्येत नसतानाही २२ जुलै, २०१४ रोजी पोलिसांनी अटक केली. निर्दोष असल्याचे निवेदन न्यायमूर्तींना दिल्याचेही नातेवाईक आणि आरोपी मनीष जाधव याने सांगितले.

“न्यायव्यवस्था कशी? ह्यावर न्यायालयात अर्धातास बोलण्यास मुभा दिली.

न्यायमूर्ती पी आर कदम यांच्या न्यायालयात आरोपींनी बोलण्याची मुभा मागितली. त्यावर न्यायालयात न्याय व्यवस्था कशी यावर जवळपास अर्धातास मतप्रदर्शन आरोपींनी केले. आरोपींची न्यायालयात उज्ज्वल निकम यांचा दाखला दिला. तर सध्या नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी एका प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला याबाबतचा दाखलाही आरोपींनी न्यायालयात दिला. न्यायमूर्तींनी आरोपींच्या मत प्रदर्शनासाठी अर्धातास मुभा दिली होती अशी माहिती विशेष सरकारी वकील संगीत फड यांनी दिली.

21830 Views
Shares 0