Wed. Mar 29th, 2023

राष्ट्रीय कवि संमेलनाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष. ३ फेब्रुवारी ला गडकरी रंगायतन मध्ये होणार कवि संमेलन.

ठाणे : हिंदी भाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती या संस्थांच्या वतीने संयुक्तरित्या ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी रंगायतन येथे राष्ट्रीय कवि संमेलन आयोजित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कवि संमेलनाचे संयोजक आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शर्मा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाबद्दल जागृतीकरिता आणि राष्ट्रभाषेच्या योग्यरीत्या प्रचार आणि प्रसाराच्या उद्धिष्टाने सलग २५ व्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरीसाठी ३ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हिंदी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ साहित्यिक डॉ. सुर्यबाला यांना डॉ. हरीवंशराय बच्चन पुरस्कार, देशाच्या संरक्षणार्थ स्वतःला झोकून देत अप्रतिम सहासिक कामगिरी करणारे भारतीय सैन्यातील परमवीर चक्र विजेते कैप्टन सुभेदार मेजर बाना सिंग यांना महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार, आपल्या अष्टपैलू कामगिरीने महाराष्ट्राच्या नावास देशात परदेशात लौकिक मिळवून देणारे आमदार संजय केळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच समारंभाच्या या रौप्य महोत्सवी वर्षी शहीद लष्करांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देश- परदेशात सायकल यात्रा करणारे सैनिक परिवार मित्र हिरालाल यादव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात हास्यसम्राट जेष्ठ कवी शशिकांत यादव( देवास) यांच्या सूत्रसंचालनामध्ये होणाऱ्या कवि संमेलनात पदमश्री डॉ. सुरेंद्र दुबे ( रायपूर ) , पद्मश्री डॉ. सुनील जोगी ( दिल्ली ), अब्दुल गफ्फार ( जयपूर ) , सुदीप भोला ( जबलपूर ) , कविता तिवारी ( लखनौ ) , गौरी मिश्रा ( नैनिताल ) , अर्जुन अल्ह्ड ( कोटा ) आदी कविंना आमंत्रित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. राज के. पुरोहित, खासदार राजन विचारे , पालघर चे खासदार ॲड. चिंतामण वनगा , महापौर मिनाक्षी शिंदे , ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह , राज्य पोलीस दलाचे अप्पर महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, श्रीनगर चे चीफ कमांडिंग ऑफिसर शैलेंद्र मिश्रा , उद्योगपती अजिताभ बच्चन, प्रवचनकार आचार्य मृदुलकांत शास्त्री , ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश भोसले , जेष्ठ पत्रकार पद्मश्री मुजफ्फर हुसेन, जेष्ठ समाजसेवक देवकुमार सराफ हे सुद्धा या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.

27888 Views
Shares 16