Mon. Aug 15th, 2022

मुंब्य्रात टी एम. टी .च्या वाहन चालकाला महिलेची मारहाण आणि शिवीगाळ.

ठाणे : प्रतिनिधी

मुंब्रा येथे किस्मत  कॉलनी  येथील बसस्टॉप वर बसलेल्या ४५ वर्षीय सुशिक्षित महिलेने ठाणे परिवहन सेवेच्या वाहकासोबत हुज्जत घातली  आणि त्याला शिवीगाळ करून  त्याच्या कानाखाली मारल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ठाणे परिवहन सेवेची (टी एम. टी .)बस क्र. एम. एच.-०४ एच. वाय. ७६३० ह्या बसचे वाहक संतोष तुकाराम चव्हाण (२१ ) हे आपले कर्तव्य बजावत असताना मुंब्रा येथे किस्मत  कॉलनी  येथे  बसस्टॉप वर बस थांबली असताना या बसमध्ये आरोपी रुकसाना मसूद बेग (४५ ) ही बस मध्ये चढली आणि तिने  वाहकाला बसच्या खिडकीची काच खोलण्यास सांगितले असताना  “ते आमचे काम नाही, मी तिकीट बुकिंग करीत आहे” असे वाहकाने बोलल्यावर  रुकसाना हिने वाहकाला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. “इधर तुम लोगो कि क्या औकात है! और तुम्हे मारू क्या “असे बोलून तिने बसच्या वाहकाच्या  डाव्या गालावर जोरात मारून शिवीगाळ केली .

टीमटी च्या वाहक आणि चालकांवर सतत होणारे हल्ले पाहता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या आरोपी  महिलेचा क्लास चालविण्याचा  व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणाचा पुढील तपास  मुंब्रा पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक एच . एस . चव्हाण  करीत आहेत .

10585 Views
Shares 67