Wed. Mar 29th, 2023

पालिका आयुक्तांच्या मतपरिवर्तनासाठी जेष्ठ नागरिक, सिटीझन फाउंडेशन सरसावले.

ठाणे : प्रतिनिधी

पालिका महासभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या आयुक्तांनी ठाण्यात राहण्याची इच्छा नसल्याचे व्यक्त केले. मात्र ठाण्याच्या विकासाला मिळालेली गती पुन्हा मंदावेल याची धास्ती घेत, ठाण्यातील ठाणे सिटीझन फाउंडेशन सह ठाण्यातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी नीलकंठ हाईट येथे एक बैठक रविवारी बोलावली होती. बैठकीत जेष्ठ नागरिकांनी  विविध सोसायट्यांच्या पदाधिकारी यांनी पालिका आयुक्तांना पाठिंबा देत त्यांनी ठाण्यातच कार्यकाळ संपेपर्यंत राहावे यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील जेष्ठ नागरिक आणि ठाणे सिटीझन फाऊंडेशन यांच्यासह विविध सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी पालिका आयुक्तांचे मन परिवर्तन करण्यासाठी मूकमोर्चे, स्वाक्षरी अभियान आणि आयुक्तांच्या पत्नी यांना भेटून जेष्ठ नागरिक महिला आयुक्तांना ठाणे सोडून न जाण्यासाठी साकडे घालणार आहेत. ठाण्याच्या विकासाला आयुक्त जयस्वाल यांनी गतिमान केले. दरम्यान आयुक्तांनी ठाणे सोडल्यास मात्र विकासाचा वेग मंदावेल असा मतप्रवाह जेष्ठ नागरिकांचा आहे.

30012 Views
Shares 0