Wed. Mar 29th, 2023

पाण्याचा अपव्यय टाळा, नैसर्गिक होळी साजरी करा.

पाण्याचा अपव्यय टाळा,नैसर्गिक होळी साजरी करा.

महापौर-आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन.

ठाणे : प्रतिनिधी

पाण्याचा अपव्यय टाळत, नैसर्गिक होळी साजरी करण्याचे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणेकरांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. होळीसाठी नागरिकांना पाण्याचे टँकर देण्यात येऊ नये असे आदेश आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

होळीच्या सणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. जीवन देणाऱ्या पाण्याचा गैरवापर होतो. यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी होळीसाठी पाण्याचे टँकर पुरविण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे सांस्कृतिक,सामाजिक आणि धार्मिक परंपरा जपणारे शहर आहे. परंपरा आणि संस्कृती जपणे हे आरामदायी आणि आरोग्यदायी राहावे यासाठी पाण्याचा वापर आणि वृक्षाची तोड करून पर्यावरणाला हानी पोचवू नये नैसर्गिक पद्धतीने होळी साजरी करा असे आवाहन पालिका प्रशासन आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले आहे.

34708 Views
Shares 0