Mon. May 23rd, 2022

ठाण्यात भल्या पहाटे रस्त्यावरच रंगला महिला वृत्तपत्र विक्रेत्या भगिनींचा गौरव सोहळा.

?????????????????????????????????????????????????

ठाणे प्रतिनिधी :

भल्या पहाटे ठाणे रेल्वे स्टेशनच्या निर्जन रस्त्यावरच ठाण्यातल्या कष्टकरी महिला वृत्तपत्र विक्रेत्या भगिनींचा सन्मान सोहळा पार पडला. खऱ्या अर्थाने तळागाळातल्या प्रतिनिधी म्हणून गणल्या जाणाऱ्या महिला विक्रेत्यांच्या सन्मानानं ठाण्यातल्या जागतिक महिला दिनाची सुरूवात झाली.

ठाणे जिल्हा वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी यांच्या नेतृत्वाखाली महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या प्रसंगी आणि संघाचे सरचिटणीस अजित पाटील, नगरसेवक कृष्णा पाटील आणि संघाचे सदस्य उपस्थित होते. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी प्रवासीही सहभागी झाले होते. उन, वारा, पावसात वर्षाचे 365 दिवस विनातक्रार वर्तमानपत्र आपल्या घरात पोहोचतं करणारा वृत्तपत्र विक्रेता हा अगदीच उपेक्षित घटक आहे. शक्य तो गडी माणसाचा पार्ट टाईम धंदा म्हणून ओळख पडलेल्या या व्यवसायात आता मोठ्या प्रमाणावर महिला देखील खांद्याला खांदा लावून काम करतात. ठाण्यात संघटीत वृत्तपत्र विक्रेत्यांमुळे महिलांची संख्या वाढते आहे.

36883 Views
Shares 0