Fri. Jan 21st, 2022

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात पहिल्यांदाच 25 महिला गायिका एकाच रंगमंचावर.

 

“विजन म्युझिक”अँकडमीचा अनोखा उपक्रम

ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील “विजन म्युझिक” अँकडमीने  ‘संगीत संध्या’ हा हिंदी मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या मध्ये ठाण्यातील 25 महिला कलाकारांनी मराठी व हिंदी  गाणी सादर करून एक अनोखा जागतिक महिलादिन साजरा केला. ठाण्यातील वर्तकनगर येथील ए.व्ही. सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी समाजसेविका शशी अग्रवाल, व डॉ प्रतिभा गुप्ते उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की “स्त्री आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे संगीत क्षेत्रात पण ती आपली क्षमता सिध्द करत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रीचा खरा सम्मान झाला आहे .

विजन म्युझिक अकादमी गेली 6 वर्ष संगीत माध्यमातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा ठिकाणी मोफत गायनाचे कार्यक्रम करीत आहे. विविध ठिकाणी आपली कला सादर करून मिळालेले पैसे ते वृद्धाश्रम, अनाथाश्रमात मदत करतात . विजन म्युझिकच्या सचिव वैष्णवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील 25 गायिकांनी  एकत्र येऊन गीत गायनाने यंदाचा महिला दिन साजरा केला.

“नवीन गायक तयार करणे व कार्यक्रमातून मिळलेले पैसे वृद्धाश्रम, अनाथाश्रमला मदत म्हणून देणे हाच विजन म्युझिक अँकडमीचा उदेश्य असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे असे  विजन म्युझिक  अँकडमीच्या  सचिव वैष्णवी यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पहिल्यांदाच काही महिलांनी गीत गायन केले.या सर्व महिला गायिकांना विजन म्युझिक  अँकडमीवतीने  सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले .या कार्यक्रमाला ठाणेकर महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला .

 

 

 

48626 Views
Shares 108