Sun. Jul 3rd, 2022

विधानपरिषद आमदारकी साठी मुख्यमंत्री यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करणारे 3 जण गजाआड.

विधानपरिषद आमदारकी साठी मुख्यमंत्री यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करणारे 3 जण गजाआड.

ठाण्यातील भाजप नगरसेवकाने उघडकीस आणला प्रकार.

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना जून मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी एक जागा देण्यासाठी 6 मार्च रोजी एका महिलेने 10 कोटी रुपये मागितले होते, हा संपूर्ण प्रकार प्रामाणिक छबी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारा असल्याचा निदर्शनास आल्यावर डुंबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधून ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या वतीने सापळा रचून इमानदार नावाच्या महिलेला 25 लाख देताना रंगे हात पकडले.

6 मार्च रोजी फोनवरून 10 कोटींची मागणी करत आमदारकी ची ऑफर आली होती, हा सगळा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यावर हकीकत डुंबरे यांनी सांगितली. त्यानंतर पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा झाल्यावर या टोळीचा पर्दाफाश करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या कारवाई साठी पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 ला या संदर्भात अधिक तपास करण्याचे आदेश दिले आणि त्या नंतर फोन रेकॉर्डिंग करून पोलिसांनी सापळा रचत एक महिला आणि पुरुष यांना अटक केली.

या संपूर्ण प्रकारात व्यवहार 25 लाख रुपये ऍडव्हान्स तर 4 कोटी 75 लाख शपथ विधीच्या आधी आणि 5 कोटी शपथ विधी नंतर असा व्यवहार ठरला होता. या व्यवहारातील 25 लाख दिल्या नंतर मुख्यमंत्री यांच्याशी फोन वरून बोलण कबूल करून देण्याचे आरोपीने कबुल केले होते. यासाठी मुख्यमंत्री यांचा आवाज काढणाऱ्या कलाकाराची मदत घेण्यात आली होती या कलाकाराला देखील ठाणे पोलिसांनी आळेफाटा येथून अटक करण्यात आली असुन पुढील अधिक तपास ठाणे पोलीस करीत आहेत.

या प्रकरणात अटक आरोपी महिला अनुद सज्जाद शिरगावकर ही मास्टर माईंड असून तिच्या सोबत अनिल कुमार भानुशाली लाही ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अब्दुल्ला फैयाज अन्सारी याला मुख्यमंत्र्यांचा आवाज काढल्या बद्दल आळेफाटा येथून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे आता या संपूर्ण प्रकरणात या अटक आरोपीना आणखी कोणाची फसवणूक केलेली आहे का याचा शोध ठाणे गुन्हे शाखा घेत आहे.

या सर्व प्रकाराबाबत गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

74897 Views
Shares 0