Sun. Dec 4th, 2022

स्वर्गीय बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले राज ठाकरे काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या तालमीत खुराकासाठी दाखल !!

स्वर्गीय बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले राज ठाकरे काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या तालमीत खुराकासाठी दाखल !!

राज्यस्तरीय राजकीय कुस्तीची तयारी तेल लावून जोरात सुरू !!

शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखती नंतर राजकीय समीकरणे बदलायला सुरवात झाली आहे. राज यांचे भाषण अभ्यासपूर्ण झालेले दिसत आहे. भाषणाच्या आधी पवार साहेबांची घेतलेली भेट फळाला आली असे वाटत आहे. त्यांच्या भाषणातील मुख्य रोष हा सरकारवरच दिसत होता. मोदींची गुजरातला जाऊन स्तुती करणारे व नंतर निवडणूकीआधीच मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे , आजकाल मोदींचा आणि भाजपा सरकारचा ठाकरे शैलीत समाचार घेत आहेत हे बघून काही लोकांना अचंबित वाटत असेल पण त्या मागे असणाऱ्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे सुद्धा गांभीर्याने घेण्यासारखे आहेत.

आज नीरव मोदी सारखा माणूस देशाला गंडवून पळून जातो आणि पंतप्रधान गुपचूप बघत बसतात.
श्रीदेवीचे मृत्य प्रकरण 3 दिवस लावून धरले जाते त्यात आणखी भर म्हणजे राज्य सरकारने सुद्धा तिचा शासकीय अत्यंविधी असा केला की जसे तीने देशाच्या सीमेवर लढून वीरमरण पत्करले होते. स्वतःची प्रकरणे मीडिया तून झाकण्यासाठी सरकार राजकीय शिष्टाचार सुद्धा धाब्यावर बसवत आहे.

मुख्यमंत्री तर डान्स गाण्याचा आणि सुमार नृत्याचा विडिओ बनवण्यात व्यस्त आहेत त्या विडिओ साठी खर्च कोणी केला आणि मुख्यमंत्र्यांना लोकांची कामे सोडून हा व्हिडिओ बनवायला कसा वेळ मिळतो हा एक चर्चेचा विषय आहे आणि जर लोकांची कामे फेकू वृत्ती सोडून गांभीर्याने केली असती तर असे करमणुकीचे विडिओ बनवायला मेहनत घ्यावी लागली नसती! आज मीडिया सुद्धा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. सरकार विरुद्ध बातम्या दिल्या जात नाहीत. जस्टीस लोयांचे इतके गंभीर प्रकरण सुद्धा चर्चिले जात नाही कारण त्या प्रकरणाशी सरकारशी लागेबांधे आहेत. न्यायालयीन व्यवस्थेवर दबाब आहे ,इतिहासात कधी झाले नाही असे मागे घडले, न्यायधीशांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या वर असलेला दबाव जनतेसमोर सांगावा लागला. त्यावरून संविधानाचा तिसरा स्तंभ धोक्यात आहे असे दिसते. स्वतःचे व सरकारच्या शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाचा वापर करण्यात येत आहे, सरकार विरुद्ध कोणी काही बोलले की त्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचे काम चालू आहे. एका बाजूला लोक पैसे बुडवून पळवून जात आहेत त्यावेळी सरकारी यंत्रणा मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेऊन बसले आहेत .

आजही सरकार आधीचे आश्वासन पूर्ण करण्यापेक्षा नवीन खोटी आश्वासने देण्यात मश्गूल आहे . बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प आपल्या गुजरात मधल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी मोदी मुंबईच्या लोकांवर मारत आहेत त्यासाठी मुंबई मधल्या जागा बळकावण्याचे काम जोरात चालू आहे आणि त्याला पैसे सुद्धा महाराष्ट्र सरकार ने द्यायचे. आधीच राज्य सरकार वर कर्ज आहे आणि बाजूच्या राज्यातील श्रीमंत लोकांसाठी महाराष्ट्र राज्याने कर्ज काढायचे ते पण मोदींच्या हट्टापायी !!

आज महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात दुष्काळ वाढत आहे , ग्रामीण भागात योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पैशाची गरज आहे तिकडे निधी टाकायला नसताना हे फालतू चे महाराष्ट्र सरकार दुसऱ्या राज्यासाठी करत आहे. आज महाराष्ट्रामधला शेतकरी मरत आहे , महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या नाही अणि सरकार उरला सुरला निधी फालतू कामावर ओवाळून टाकत आहे. सरकारला माहीत आहे की गुजरातच्या पैसा वर महाराष्ट्रातील मते विकत घेता येतात, म्हणून मोदी इतकी हिंमत करू शकतात.

आज विमान घोटाळ्याचा वास येत आहे, विमान खरेदी कराराचा आकडा फुगवलेला दिसत आहे आणि त्याची कुठे वाच्यता होताना दिसत नाही . ज्या उदयोगपतींनी मोदींना 2014 च्या निवडणूकीमध्ये पैसे दिले त्यांना आता कामे देऊन त्याची परतफेड केली जात आहे. ज्या कंपन्याना ती कामे दिली जात आहेत त्या कंपन्यांना त्या क्षेत्रातील अनुभव सुद्धा नाही आहे , उद्या ते विमान बनवतील पण त्याच्या दर्जाची जबाबदारी कोणाची , आमच्या सैनिकांच्या जीवाची हमी कोण देणार ? तो पर्यंत मोदींना माहीत आहे की माझा कार्यकाळ संपलेला असेल आणि मग त्या वेळी काहीही झाले तरी त्या वेळचे सरकार बघून घेईल. आज देशामध्ये खोटी गुंतवणूकीचे आकडे दाखवले जात आहेत , लघु उदयोजकांना खोटे कर्ज वाटप कागदावर दाखवले जात आहे. जर देशात 4 वर्षा मध्ये एवढीच गुंतवणूक आली आहे तर बेरोजगारी का वाढत आहे? देशाचा विकास दर का संथ झाला आहे ? सरकार ला माहीत आहे की लोक आता प्रश्न विचारतील पण यानंतर निवडणुकीच्या आधी धर्माचे किंवा जातीचे राजकारण करून निवडणुका जिंकता येतील आणि आता भाजपा ने त्याची सुरवात राम मंदिरा च्या मुद्द्यावरून सुरू सुद्धा केली आहे .

– प्रशांत डावखर यांचा विशेष लेख.

 

106338 Views
Shares 61