Mon. May 23rd, 2022

रेल्वे कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा

रेल्वे कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा. लाखो रुपये असलेली बॅग सापडल्यावर केली परत.

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात येणाऱ्या प्रवाश्यांच्या प्रचंड गर्दीमुळे दिवसेंदिवस शहरांचा वेग वाढत आहे. तेव्हा, सगळे काही गतिमान झाले असल्याने एखाद्याचे गहाळ झालेले सामान अवघ्या काही क्षणातच हातोहात गायब होते. मात्र, याला अपवाद ठरल्या आहेत ठाण्यातील कळवा येथील रहिवाशी दीप्ती गावडे.

दीप्ती गावडे यांची लाखमोलाची बँग तब्बल चार दिवसानंतर सुखरूप परत मिळाली आहे. या बँगेत तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज व मुद्देमाल होता. महिला रेल्वे कर्मचारी रेखा शिंदे यांच्या प्रामाणिकपणामुळे गावडे यांचा ऐवज परत मिळाल्याने गावडे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे . त्यांनी महिला रेल्वे कर्मचारी शिंदे यांचे आभार मानले.

राम नवमीच्या सुट्टी निमित्ताने दीप्ती गावडे गावी जाणार होत्या, घरातील सोने बँकेच्या तिजोरीत ठेवण्यासाठी २३ तारखेला ठाण्याहून जलद ट्रेनने मुंबईकडे निघाल्या. त्यांनी आपल्या बॅगेत २० तोळे सोनं आणि लॅपटॉप असा ऐकून साडेसहा लाखांचा ऐवज ठेवला होता. त्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनल ला जाणारी जलद लोकल पकडली. मात्र ट्रेनमध्ये सीटवरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाला कंटाळून गावडे या भायखळा येथे उतरल्या. काही वेळानंतर ट्रेन मध्ये आपली बॅग राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर गावडे यांनी त्वरित रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान ४ दिवसानानंतर त्यांना रेल्वे पोलीसांकाडून फोन आला, दीप्ती गावडे यांची बॅग मुद्देमाल सह मिळाली असे समोरून सांगण्यात आले आणि दीप्ती यांचा कोणावरच विश्वास बसेना. सदर बॅग रेल्वे मध्ये काम करणारी महिला रेल्वे कर्मचारी रेखा शिंदे यांना सापडली. रेखा शिंदे यांनी आपली प्रामाणिकता दाखवीत साडेसहा लाखांचा मुद्देमालासह बॅग परत केली.

२२ वर्षापासुन रेल्वे मध्ये काम करणाऱ्या रेखा शिंदे यांनी आपला प्रामाणिकता दाखवली. दरम्यान रेल्वे प्रशासनानाने रेखा शिंदे यांची त्याची दखल घेतली असुन त्यांना पुरस्कार देण्यासाठी दिल्ली येथे आमंत्रित केले आहे.

25783 Views
Shares 0