Mon. May 23rd, 2022

खाजगीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी जर भर लोकांसमोर तोंडातुन निघाल्यावर …. असेच काही फसगत झाली अमित शहा यांची !!

         कर्नाटक मध्ये अमित शहा यांची पत्रकार परिषद चालू असताना असा प्रकार घडला की सगळे पत्रकार काही क्षणाकरता स्थब्ध झाले. बाजूला बसलेल्या आपल्याच पक्षाच्या माजी  मुख्यमंत्र्यांचे शहा यांनी अब्रूचे धिंडवडे काढले . अमित शहा यांनी  ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या मते येदूरपप्पा हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत ‘असे विधान करून बाजूलाच बसलेल्या येदुरप्पा ना धडकी भरवली , भाजप च्या प्रदेश अध्यक्षानी चूक लक्षात आणून देताच त्यांनी ती दुरुस्त केली आणि येदुरप्पा यांनी सुटकेचा निश्वास सोडला.पण हा किस्सा दिवसभर राजकीय पक्षाच्या लोकांसाठी हास्याचा विषय झाला होता .
67418 Views
Shares 0