Tue. Jun 15th, 2021

पंतप्रधान पदासाठी कित्येक दशकांनी मराठी नावाची दिल्लीत चर्चा !! विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्त्व करण्यासाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत !!

     काल ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली , त्यात मोदी सरकार विरुध्द आघाडी उभारण्या बाबत चर्चा झाली , शरद पवार यांचे  भारतातील सर्वच राजकीय नेत्यांसोबत उत्तम संबंध असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांचे पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो, ममता यांच्या पक्षाचे सध्या लोकसभेमध्ये 34 खासदार आहेत आणि पुढील निवडणूकीत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे , त्याखालोखाल ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे चे खासदार संजय राऊत यांची पण भेट घेतली , विरोध कांच्या या आघाडीचे नेतृत्व जर शरद पवार करणार असतील तर शिवसेना पण त्यात सामील होऊ शकते याचे ते संकेत आहे. त्याच बरोबर शरद पवारांचे विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर प्रत्यक्ष आणि फोन वरून सुद्धा चर्चा चालू आहे.
20181 Views
Shares 0