Sun. Dec 4th, 2022

तुम्ही फेसबुक वर काय करता, काय बघता सगळे माहीत असते फेसबुकच्या लोकांना !!

    फेसबुक कंपनी वर आज सगळीकडून टीकेचा मारा होत आहे , फेसबुक  कंपनी ने आपल्या सगळ्या वापरकर्त्यांची  चा डाटा हा इंग्लंड मधल्या एका कंपनी ला विकला आणि त्या कंपनी ने त्या डाटा चा अभ्यास करून ट्रम्प यांची प्रचार मोहीम राबवली, आणि राजकारणाचा गंध नसलेले  अमेरिकेमध्ये ट्रम्प विजयी झाले !
  आता प्रश्न असा आहे की , हे आपला डाटा  मिळवून काय करतात , डाटा  म्हणजे काय? काय काय असते डाटा  मध्ये ?  यामध्ये आपले नाव,  आपले लोकेशन ,आपण कुठे कुठे भेटी दिल्या , आपला मोबाइल क्रमांक ,  आपण कोणते पेजेस , इमेजेस , व्हिडिओस लाइक करतोय, आपण कोणत्या प्रकारच्या पोस्ट वर जास्त वेळ घालवतोय , आपल्या आवडी निवडी काय आहे ही सगळी माहिती ह्यातून कळते ,मग ह्या माहितीला गणिती आणि सांख्यिकी प्रणाली वापरून रूपरेखा दिली जाते , ह्या मागे गणितीतज्ञ ,मानस शास्त्रज्ञ , कॉम्पुटर वैज्ञानिक काम करत असतात . ह्या सर्व कामाची खूप फीस आकारली जाते. एकदा काय लोकांच्या आवडी निवडी कळल्या का फेसबुक  व इतर सोशल नेटवर्किंग अँप वर , वापर कर्त्यांचे वर्गीकरण करून त्याला आवडतील असेच कॅमपेन  दाखवले जातात ,त्यामुळे त्यांचा पण फालतू चा खर्च आणि वेळ वाचतो पण दुर्दैवी बाब अशी की तो डाटा  कायमस्वरूपी त्यांच्या कडे गेलेला असतो.
आपल्या साईट वरील डाटा  हा त्रयस्थ व्यक्तीला देणे हे चुकीचे का बरोबर या मध्ये सुद्धा तज्ञामध्ये मतभेद आहे ,अजून ही या बाबतीत असलेले कायदे संदिग्ध आहेत, पण ज्या वेळी युसर लॉगिन करतो त्या वेळीच त्याला एक पॉप अप मेसेज आला पाहिजे की  त्याला आपला डाटा  भविष्यात शेअर करायला आवडेल का आणि जर त्याला काहीच समस्या नसेल तर तेवढा शेअर करावा बाकी सुरक्षित ठेवावा, प्रत्येक व्यक्तीला आपले खाजगीपण असते ,कोणालाच ते भंग झालेले किंवा त्यामधे कोणी लुडबुड केलेली आवडत नाही याची फेसबुक ने सुद्धा नोंद घ्यावी.
आज जगात काही फुकट मिळत नसताना,फेसबुक कसे आपल्याला  फुकट  सुविधा देतो ? असा प्रश्न कित्येकांना पडायचा मग त्या वर उत्तर मिळायचे की फेसबुक जाहिरातींमधून पैसे कमावते पण त्या पेक्षा ही जास्त पैसे  फेसबुक ला म्हणा किंवा इतर सोशल नेटवर्किंग अँप ला आपल्या वापर कर्त्यांचा खाजगी डाटा विकून मिळण्याची शक्यता जास्त आहे. आज भारतामध्ये सुद्धा राजकीय पक्ष , कॉर्पोरेट कंपन्या आपला डाटा  विकत घेऊन त्यानुसार आपली प्रचाराची रणनीती ठरवण्याची दाट शक्यता आहे , आणि आता तशी कुणकुण कानावर सुद्धा येत आहे, मग असे असले तर आपली सगळी खाजगी महिती असा प्रकारे वापरणे हे जागतिक मानवी हक्कांची आणि भारतीय राज्य घटनेतील मूलभूत हक्काचा सुद्धा भंग आहे , संबधीत घटकांवर कारवाई होणे गरजेचे आहे व याबाबतीत स्पष्ट कायदा येणे जरुरीचे आहे.
134001 Views
Shares 11