Wed. Mar 29th, 2023

24 एप्रिल पासून दोन महिने सुरु राहणार ‬मुंब्रा बायपासचे काम,वाहतुकीत मोठे बदल.

‪ठाणे : प्रतिनिधी ‬

‪मुंब्रा बायपास रोडच्या दुरुस्तीचे काम 24 एप्रिल पासून सुरु करण्यात येत असल्याने बायपास रोडद्वारे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने केलेल्या वाहतुकीचे नियोजन वाहतूक उपायुक्त अमित काळे यांनी गुरुवारी तीनहात नाका येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ‬

‪              24 एप्रिल पासून दोन महिने २४ तास मुंब्रा बायपास रोड हा वापरासाठी बंद राहणार आहे. या बायपासचा वापर करणाऱ्या वाहनांच्या रस्त्यात बदल करण्यात आले आहेत.  जे एन पी टी – नवी मंबई – दक्षिण भारतात पुणे मार्गे – कळंबोली सर्कल – नवीन मुंबई – तळोजामार्गे येथून नाशिक , गुजरात भिवंडी येथून उत्तर भारतात जाणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण फाटा आणि शिळफाटामार्गे मुंब्रा बायपास मार्गे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.‬

‪ या वाहनांना पर्यायी मार्ग ‬
‪जे एन पी टी कडून –  नवी मुंबई कडून नाशिक दिशेने जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांसाठी जे एन पी टी पॉईंट , ‬पळस्पे फाटा‪ , डावीकडे वळण घेऊन जुन्या मुंबई रोडने चौकगांव , चौकफाटा , त्यानंतर डावीकडे वळण घेऊन कर्जत मुरबाड , डावीकडे वळण घेऊन सरळगाव , डावीकडे वळण घेऊन किन्हवली मार्गे शहापूरवरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून नाशिक किंवा नाशिकच्या दिशेने जाता येईल. ‬

‪जे एन पी टी -नवी मुंबई येथून भिवंडीकडे जाणारे अवजड वाहने रात्री ११ ते ५ या कालावधीत जे एन पी टी , कळंबोली सर्कल , तळोजा , कल्याणफाटा , याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडने काटई , पत्रीपूल , कल्याण दुर्गाडी सर्कल पूल , कोणगाव , रांजणोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून भिवंडीकडे जाता येणार आहे.  ‬

‪       दुसरीकडे नवी मुंबईकडून उरणफाटा मार्गे महापे  सर्कलकडून शिळफाटा मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन शिळफाट्याकडे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे . या वाहनांना पर्यायी रस्ता  रात्री ११ ते पहाटे  ५ या वेळेत महापे सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन हॉटेल्स पोर्टिका सरोवर समोरून उजवे वळण घेऊन रबाळे एमआयडीसी मार्गे रबाळे नाका , ऐरोली पटनी सर्कल , डावीकडे वरून ऐरोली सर्कल , उजवीकडे वळण घेऊन मुलुंड ऐरोली पुलावरून ऐरोली टोल नाका मार्गे उजवीकडे वळण घेऊन पूर्वद्रुतगती मार्ग  मुलुंड आनंदनगर टोल नाक्यावरून घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने जातील. ‬

‪तिसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ – अहमदबाद गुजरातकडून जे एन पी टी नवी मुंबईकडे व पुणे मार्गे दक्षिण भारतात जाणारी अवजड वाहनांसाठीमुंब्रा बायपास वापरणे २४ तास बंद करण्यात येणार आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून  टेननाका वसई मार्गे वाकोडा टोलप्लाझा , वाडा गाव याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन , कवाड टोल नाका ,- नदी नाका पुलावावरून डावीकडे वळण घेऊन चावींद्रा , वडापा , मुंबई नाशिक हायवेवरून उजवीकडे वळण घेऊन पुढे येवईनाका याठिकाणी डावीकडे वळण घेऊन – पाईपलाईन मार्गे , सावध चौक – उजवीकडे वळण घेऊन गांधारी पुलावरून – आधारवाडी सर्कल – उजवीकडे वळण घेऊन दुर्गाडी पत्रीपूल मार्गे टाटा हाऊस – बदलापूर चौक येथून डावीकडे वळण घेऊन खोली सर्कल मार्गे उजवीकडे वळण घेऊन तळोजा मार्गे एमआयडीसी नाव्हड फाटा कडून डावीकडे वळण घेऊन कळंबोली सर्कलवरून  रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत इच्छास्थळी पोचतील . ‬

‪चिंचोटी येथून जे एन पी टी येथे भिवंडी नारपोली मार्गे जाणाऱ्या वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंद करण्यात आला आहे . परंतु चिंचोटीवरून नारपोली भिवंडी परिसरात येणारी अवजड वाहनांना मालोडी टोलनाका मार्गे पूर्णवेळ अंजूरफाटा येथे प्रवेश देण्यात येत आहे . ‬

‪वर्सोवाकडून जे एन पी टी नवी मुंबई व दक्षिण भारतात जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत प्रवेश देण्यात येत असून हि वाघोडबंदर रोडने कापूरबावडी – कोपरी पूल – मुलुंड चेकनाका – ऐरोली टोल नाका मार्गे – ऐरोली टोल नाका मार्गे ऐरोली सर्कल – डावीकडे वळण घेऊन पटनी जंक्शन – उजवीकडे वळण घेऊन रबाळे नाका , महापे सर्कल – उरण फाटा येथे इच्छित स्थळी जातील . घोडबंदर रोडने गुजरातकडून नवीन मुंबई जे एन पी टी कडे येणाऱ्या व नवीन मुंबई जे एन पी टी घोडबंदर रोड मुरबाडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना दुपारी १२ ते सायंकाळी ६पर्यंत आनंदनगर चेक नाका मार्गे जे एन पी टी गुजरात कडे ये जा करतील. ‬

‪चौथीकडे  भिवंडीकडून जे एन पी टी नवी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपास मार्गे जाण्यास बंदी करण्यात आली आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून भिवंडीकडून जे एन पी टी किंवा पुणे मार्गे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना माणकोली जंक्शन – नाशिक मुंबई हायवे – रांजणोली नाका , – किन्हवली ,- सरळगाववरून उजवीकडे वळून मुरबाड , कर्जत – चौक नाका येथे इच्छित स्थळीजातील . रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत भिवंडीवरून माणकोली नाका , डावीकडे वळून मुंबई नाशिक हायवे – रांजणोली नाका – येवाई नाका उजवीकडे वळून – सावध चौक – गांधारी पूल – आधारवाडी – दुर्गाडी सर्कल – पत्री पूल – बदलापूर चौक – कटाई चौक – उजवीकडे वळून तळोजा एमआयडीसी – कळंबोली सर्कल या पर्यायी रस्त्यावरून इच्छित स्थळी जातील . ‬

31122 Views
Shares 105