Mon. Aug 15th, 2022

ठाण्यात परत अल्पवयीन मुलगी टार्गेट !!

शाळकरी मुलीच्या डोळ्यात माथेफिरुने मिरचीची पुड टाकली.

ठाणे : प्रतिनिधी
डान्स क्लास आटोपून घरी परतत असताना 16 वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या 20 ते 21 वयोगटातील माथेफिरू युवकाने मुलीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून हल्ला केल्याची धक्कदायक घटना ठाण्यातील चरई परिसरात बुधवारी (ता.25) रात्री घडली. याप्रकरणी,नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे.

खोपट परिसरात राहणारी पिडीत शाळकरी मुलगी बुधवारी सायंकाळी टेंभी नाका परिसरात डान्स क्लाससाठी गेली होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एकटीच पायी घरी परतत असताना सावळ्या रंगाच्या साडेपाच फुट उंची गडद जीन्स आणि काळ्या नक्षीचा तपकिरी रंगाचा शर्ट परिधान केलेल्या 20 ते 21 वयोगटातील युवक तिचा पाठलाग करीत होता. चरई परिसरात येताच लांब केसांच्या त्या माथेफिरू युवकाने पिडीत मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. अशी तक्रार पिडीत मुलीने नौपाडा पोलिसात केली आहे.

4782 Views
Shares 115