Sun. Jul 3rd, 2022

१९ वर्षे फरार आरोपीला अखेर खंडणी विरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांच्या पथकाने केली अटक.

1998 मध्ये केबल व्यवसायिकाची हत्या
करून फरारी आरोपीला मुंबईतून अटक.

प्रदीप शर्मा यांच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी.आरोपी मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन.

ठाणे : प्रतिनिधी

केबल व्यवसायात पैशाच्या देण्या घेण्यातून तारिक परवीन आणि ६ ते ७ जणांनी इब्राहिम मोहम्मद याची गोळ्या घालून हत्या करून तब्बल १९ वर्ष फरारी होता. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबईतून अटक केली. पुढील तपासासाठी आरोपी तारिक परवीन याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे दिली.

अटक आरोपी तारिक परवीन रा. मुंब्रा हा केबल व्यवसायिक होता. मृतक इब्राहिम मोहम्मद याचाही केबल व्यवसाय होता. पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादात आरोपी परवीन तारिक आणि शौकत खिलजी ५ ते ६ जणांनी मुंब्रा किस्मत कॉलनी येथे गोळ्या घालून इब्राहिम मोहम्मद याची हत्या केली होती. या गोळीबारात एका लहान मुलीच्या मांडीला गोळी लागली होती.  या हत्या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. दरम्यान आरोपी परवीन तारिक हा तेव्हापासून फरारी होता. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा याना मिळालेल्या माहितीच्या आधारे परवीन तारिक हा अशोक शॉपिंग सेंटर, जीटी रुग्णालय,एल टी रोड  मुंबई येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पथकाने मुंबई परिसरात त्याचा शोध घेत आरोपी तारिक अब्दुल करीम परवीन याला अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी परवीन तारिक याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुंब्रा पोलीस अधिक तपास  करीत आहेत.

27375 Views
Shares 115