Sat. Dec 4th, 2021

आता बँकांच्या ATM मधेही मराठी भाषेची गळचेपी!

कॅनरा बँकेच्या ATM मध्ये तेलगू भाषेचा पर्याय पण मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही!!
मराठी भाषेचा अपमान !!
भयंकर आणि संतापददायक प्रकार !!

महाराष्ट्रा मध्ये व्यवसाय करणाऱ्या काही खाजगी आणि राष्ट्रीय बँकांनी मराठी ची थट्टा लावली आहे , नुकताच एक प्रकार समोर आला आहे, कॅनरा बँकेच्या ठाण्याच्या ATM मध्ये मराठी चा पर्याय च उपलब्ध नाही वरून नवी मुंबई मध्ये तर तेलगू भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे पण मराठी भाषेला पर्यायामधून डावलले आहे.

बँकांनी आपल्या दैनंदिन कामकाजात स्थानिक भाषेचा वापर केला पाहिजे असा कायदा असताना कॅनरा बँकेने तर हा कायदा धाब्यावर बसवण्याचे काम चालू केले आहे , अशा संस्थांवर कडक कारवाई करून योग्य तो संदेश शासनाने मराठी ला दुय्यम स्थान देणाऱ्यांना दिला पाहिजे, मराठी भाषिकांनी पण असे प्रकार दिसले की यावर आवाज उठवला पाहिजे ,नाहीतर काही काळानंतर मराठी अल्पसंख्याक होऊन जाईल.

1187 Views
Shares 85