Mon. May 23rd, 2022

ठाण्याच्या सेतू केंद्रात दाखल्यासाठी लाच. दलालांचा सुळसुळाट. दोन खाजगी व्यक्ती जाळ्यात.

ठाणे : प्रतिनिधी
ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात रहिवास दाखल्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा खाजगी व्यक्तींना ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. रिझवान शेख (22) आणि साजिद सय्यद (38) अशी दोघा लाचखोरांची नावे असून त्यांनी सेतू केंद्रातील कोणत्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ही लाच स्विकारली याचा उलगडा झालेला नाही. याप्रकरणी ठाणे नगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी रहिवाशी येत असल्याने इथे दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. विनादलाल दाखले काढणाऱ्या व्यक्तींच्या अर्जात त्रुटी काढून हैराण केले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. मात्र, अधिकारी वर्गाकडून दखल घेतली जात नाही. अशाच प्रकारे रहिवासी दाखला काढण्यासाठी विनादलाल आलेल्या तक्रारदाराकडे शेख आणि सय्यद या दुकलीने 4 हजारांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार केल्यावर लाचलुचपत विरोधी पथकाने शनिवारी सकाळी सापळा रचून दोघांनाही 4 हजार स्विकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

#सेतू #तहसीलदारकार्यालयठाणे #रहिवासीदाखला #लाच #अटक #Thane #ThaneLive

(संग्रहित छायाचित्र)

7589 Views
Shares 85