Mon. Oct 3rd, 2022

कोकण पदवीधर च्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अष्टपैलू उमेदवार नजीब मुल्ला.

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार कांटे की टक्कर.

कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाणे महानगरपालिकेचे युवा तडफदार नेतृत्व विद्यमान नगरसेवक आणि कोकण बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांच्या नावाची अधिकृत घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्फत केली गेली आहे.

मागील वेळी पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने निरंजन डावखरे यांनी निवडणूक लढविलेली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात यश मिळविले होते. परंतु, डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादी ला त्यांचा गड राखण्यासाठी तगडा उमेदवार देणे भाग होते , त्यामुळे जनसंपर्क असणारा सुशिक्षित असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला नजीब मुल्लांमधे दिसला .

नजीब मुल्ला हे गेल्या चार वेळेपासून ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक असून त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून वाखाबण्याजोगे केलेलं काम त्यातच राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आणि कुशल संघटक म्हणून असलेला लोकांशी संपर्क व नेतृत्वगुण या सगळ्याची नोंद घेऊन पक्षाने या कुशल नेतृत्वावर ही जबाबदारी टाकली आहे.

याबरोबर कोकण बँकेचे ते विद्यमान चेअरमन असून या माध्यमातून ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण डोंबिवली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत बँकेचे जाळे विणले गेले आहे. नजीब मुल्ला आणि जीतेंद्र आव्हाड कित्येक वर्षे एकत्र काम करत आहेत त्यामुळे आपसातील चांगले संबंध व पक्षाची प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी राखण्यासाठी पक्षाचे सगळे गट कामाला लागतील.

शिवसेनेनेही काल ठाण्याचे माजी महापौर आणि उत्तर रायगड संपर्कप्रमुख संजय मोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे ही कोकण मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची आणि शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्येच महत्वाची लढत होणार आहे.

43397 Views
Shares 232