Mon. Apr 12th, 2021

कोकण पदवीधर मतदार संघाचा आखाडा कुठला उमेदवार जिंकणार??

ठाणे :- कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.सगळेच राजकीय पक्ष आपला प्रचार जोरात करत आहेत , ५ जिल्ह्यांचा बनून हा मतदारसंघ बनतो तरी सगळे उमेदवार ठाणे जिल्ह्यामधेच लक्ष केंद्रीत करत आहेत , कारण जवळपास निम्मे मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत .

सर्वच पक्ष जोराने कामाला लागले आहेत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ भाजप कडून खेचून आणला होता , त्यामध्ये दिवंगत वसंत डावखरे यांनी केलेली मतदार नोंदणी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना लाभ देऊन गेली. पण सध्या ते निवडणूकीच्या तोंडावर भाजप मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत असल्यामुळे , भाजपचे विद्यमान नेते नाराज आहेत त्यामुळे मूळ भाजपची असलेली किती मते त्यांना मिळतात यात शंका आहेत त्याचबरोबर मागच्या निवडणूकीमध्ये मिळालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पारंपारिक मते त्यांना मिळणार नाहीत , त्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक आणि मुख्यमंत्र्यांच्या करिष्म्यावर त्यांची मदार असेल.

शिवसेनेकडून मा. महापौर संजय मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे , त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आहे , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खुद्द प्रचारात लक्ष घातले आहे , शिवसेनेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिले की ठाण्यातील सगळे गट तट कामाला लागतात याचा फायदा मोरे यांना होऊ शकतो. शिवसेना पक्ष भाजपची मते आपल्याकडे वळवू शकतो.

विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे उमेदवार नव्हता त्यामुळे पक्षाला कमी वेळेमध्ये प्रचाराची रणनीती ठरवणारा , पक्षावर निष्ठा असणारा , जाणकार, सर्व जाती धर्माना व पक्षातील सर्व गटांना एकत्र आणू शकेल असा नेता हवा होता , हे सर्व लक्षात घेऊन राष्ट्रवादीने नजीब मुल्ला
यांना उमेदवारी दिली.

त्यांच्या निमित्ताने या मतदारसंघातली सगळी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहून प्रचार करताना दिसत आहेत. सहसा एकाच मंचावर एकत्र क्वचितच दिसणारे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक नजीब मुल्लांच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसून येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार हे स्वतः फॉर्म भरण्याच्या दिवशी स्वतः उपस्थित होते आणि नजीब यांना निवडून आणण्याचे आदेशच शरद पवार यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिले आहेत.

त्याचबरोबर नजीब हे कोंकण बँकेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे कोकणामध्ये त्यांनी बँकेमार्फत केलेलं काम त्यांना फायद्याचे ठरू शकते, रायगडचे तगडे नेते जयंत पाटील यांनी सुध्दा पाठिंबा दिला आहे , त्याचबरोबर कॉंग्रेस ची पण मदत यांना होऊ शकते..

शेवटी मतदार हाच राजा आहे तोच ठरवणार कोणाच्या गळ्यात माळ घालायची.

– प्रशांत डावखर

46902 Views
Shares 1K