Wed. Mar 29th, 2023

नवी मुंबई चे विकास पुरुष म्हणून राज्यभर ओळखले जाणारे गणेश नाईक सुद्धा नजीब मुल्ला यांच्यासाठी मैदानात!

गणेश नाईक यांची सुद्धा ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीमध्ये मुख्य भूमिका!!

गणेश नाईक हे नवी मुंबई च्या घराघरात पोहचलेले जनसामान्यांचे नेतृत्व आहे , मोदी लाटेत महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेंमध्ये शिवसेना भाजप युती चा विजय होत असताना त्यांनी नवी मुंबई हा गड राष्ट्रवादी पक्षाला शिताबीने मिळवून दिला, त्यांच्या तगड्या तळागाळात असणाऱ्या जनसंपर्कचा फायदा नजीब यांना होऊ शकतो, नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराने कित्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत , प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असा वाशी च्या मुख्य दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे , सगळ्या जाती पातीमध्ये त्यांना जनाधार आहे ,त्यामुळे नाईक यांनी जनतेला केलेले आवाहन नजीब यांना फायद्याचे ठरू शकते. नवी मुंबई मध्ये सुद्धा मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे .

नवी मुंबई एवढा नियोजनबद्ध विकास आजपर्यंत भारतातील कोणत्याही शहराचा झाला नाही .त्यामुळे नवी मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाईक यांना आदराचे स्थान आहे , त्यामुळे ५ ही जिल्ह्यामध्ये मतदान एकहाती वळवण्याची ताकद नाईक यांच्या मध्ये आहे . शिक्षण, आरोग्य , रोजगार , स्वछता , पाणी पुरवठा सर्वच बाबतीत गणेश नाईक यांचे बारीक लक्ष असते . त्यामुळे नाईक यांना सामाजिक क्षेत्रात सुद्धा आयडॉल म्हणून बघितले जाते , त्यांनी नजीब यांच्या साठी दिलेली साद ही बाकी उमेदवारांसाठी तगडे आव्हान नक्कीच उभे करू शकते !!

–प्रशांत डावखर.

54786 Views
Shares 170