Sun. Feb 5th, 2023

मुंब्र्यातील शंभर टक्के मते नजीब मुल्ला यांनाच मिळणार : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे वचन.

80 डॉक्टरांनीही दिला पाठिंबा.

ठाणे (प्रतिनिधी)- पंचवीस जून रोजी होणार्‍या कोकण पदवीधर निवडणुकीत मुंब्य्रातील 100 टक्के मतदान होणार असुन आम्ही फक्त अभ्यासू उमेदवार नजीब मुल्ला यांनाच मतदान करण्याची शप्पथ घेतली आहे, असे वचन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले. यावेळी मुंब्रा भागातील 80 डॉक्टरांनीही नजीब मुल्ला यांनाच आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

मुंब्र्याच्या कौसा येथील अमृत नगर येथे आघाडीच्या वतीने उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान , ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते.

आ. आव्हाड यांनी, नजीब मुल्ला हे आपल्या घरातील उमेदवार आहेत. त्यांचा विजय म्हणजे आपला विजय असणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांत काम केेले आहे. त्याकडे पाहिल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यासाठी आपण नजीब मुल्ला यांना प्रथम पसंतीचे मत देवून त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला पाहिजे, असे वचन दिले. तर,ं देशात बदल करायचा असेल तर आतापासूनच सुरवात करायला हवी असे मत यावेळी नजीब मुल्ला यांनी केले. निवडून आल्यावर जिल्हा जिल्ह्यत वाचनायल,अभ्यासिका, शिक्षकांसाठी ट्रेनिंग सेंटर,पदवीधरसाठी रोजगार मेळाव्याची निर्मिती करणार असल्याचे आश्वासन मुल्ला यांनी दिले. पदवीधरचे मतदान हे इतर मतदानच्या फार वेगळे असुन बॅलेट पेपरच्या माध्यमातून होणार आहे, उमेदवाराच्या नावासमोर इंग्रजी एकचा अंक काढून मतदान करायचे असते; पदवीधर मतदारांनी मतदान कसे करावे, याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी यावेळी दिली. तर, शमीम खान यांनी, या निवडणुकीसाठी आपण जीवाचे रान करु; पण, नजीब मुल्ला यांनाच विधान परिषदेत पाठवू, असा निर्धार व्यक्त केला.

विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक पदवीधर तरुण, शिक्षक, डॉक्टर यांनी मंचावर येऊन भाषण केलेच. शिवाय, नजीब मुल्ला यांच्या रुपाने शरद पवार यांनी आम्हाला अभ्यासू,सुसंस्कृत,सुशिक्षित उमेदवार आम्हाला खूप वर्षतून मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले.

3833 Views
Shares 244