Wed. Mar 29th, 2023

सिग्नल शाळेसाठी ठाणे महानगरपालिका आणखी एक पाऊल पुढे.

ठाणे महानगरपालिकेकडून मोहन, दशरथला अनोखी भेट.
सीएसआर योजनेतंर्गत मोहनचे रुस्तमजी अ‍ॅकेडमीत पुढील शिक्षण.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा पुढाकार.
 
ठाणे (26) : ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा दैदिप्यमान असा निकाल लागला. सिग्नल शाळेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ठाणे महानगरपालिका आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या आगामी शिक्षणासाठी पुढाकार घेत सीएसआर योजनेअंतर्गत मोहन काळे यास रुस्तमजी अ‍ॅकेडमीत डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला. तर दशरथ पवार याला महाविद्यालयीन प्रवेशासाठी ठाणे महानगरपालिका सहाय्य करणार आहे.
 
दोन वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने सिग्नल शाळेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर दहावीची पहिली बॅच यंदा बाहेर पडली. मोहन काळे व दशरथ पवार यांनी अनुक्रमे ७७ व ६५ टक्के मिळवून सिग्नलवर निर्वासित आयुष्य जगणारी मुले देखील उत्कृष्ट शैक्षणिक यश संपादन करु शकतात याचा आदर्श घालून दिला. या दोघांच्या यशामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विषयक उपक्रमाला देखील वाखाणले गेले. मोहन आणि दशरथच्या आगामी शिक्षणासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेत सीएसआर योजनेअंतर्गत मोहनला रुस्तमजी अकॅडमीत डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला.
 
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज त्यांच्या कार्यालयात मोहन काळे व सिग्नल शाळेच्या शिक्षकांचा सत्कार केला. ठाणे महानगरपालिका सिग्नल शाळा व त्यातील विद्यार्थ्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहील अशी ग्वाही जयस्वाल यांनी यावेळी दिली. दरम्यान अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण, उप आयुक्त संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे यांनी देखील सिग्नल शाळा टीमचे यावेळी कौतुक केले.
 
#Thane #SignalSchool #TMC #ThaneLive
 
25869 Views
Shares 85