Mon. Oct 3rd, 2022

निरंजनी करिष्म्यावर भाजपने निवडणुकीत टाकलेले “डाव” खरे करून दाखविले.

निरंजन यांनी विजय मिळवत आमदार पद राखले.

कोकण पदवीधर –विजयी उमेदवार – निरंजन डावखरे (मिळालेली मते ३२८३१)
कोकण पदवीधर – संजय मोरे (मिळालेली मते २४७०४ )
कोकण पदवीधर – नजीब मुल्ला (मिळालेली मते १४८२१)
कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी 72.35 आहे.
या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात, यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात.

निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.

तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली.
यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

18343 Views
Shares 236