Sun. Feb 5th, 2023

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्यातील चार जण चमकले.

ठाणे (प्रतिनिधी)- अंधेरी स्पोर्टस् क्लबमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ठाण्यातील चार मुलांनी सुवर्ण आणि रजत पदक पटकावले आहे.

कराटे इंटरनॅशनल या संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश, हरयाणा, दिल्लीसह देशभरातील तसेच श्रीलंका येथील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्रीलंकेच्या खेळाडूंना अंतिम फेरीत नमवून काता-कुमिते प्रकारात रेनी नरेंद्र शर्मा आणि इसाना नियोगी यांनी सुवर्ण तर काता-कुमिते प्रकारातच निक्षा सचिन जैन आणि कायान राहिल खान यांनी रजत पदक पटकावले.
गेली दोन ते तीन वर्षे प्रशिक्षक सलाउद्दीन चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली हे चारही जण सदर स्पर्धेची तयारी करीत होते. हे चौघेजण ठाणे येथे राहणारे आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ठाण्याचे नाव उंचावले असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

22446 Views
Shares 5