Wed. Mar 29th, 2023

रस्त्याच्या उदघाटनासोबत 28 निष्पापांच्या बळींचेही श्रेय भाजपने घ्यावे – संजय मोरे, शिवसेना संपर्क प्रमुख

पनवेल (वार्ताहर) ः कामोठे शहरातून पनवेल सायन महामार्गाला जोडणाऱ्या सेवारस्त्याचे काम चार वर्षांपासून ठप्प होते, झोपलेल्या पीडब्ल्यूडी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासह पनवेल परिसरातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन रास्तारोकोचे आंदोलन करून सचिवालयात बैठका घेण्यास प्रशासनाला भाग पाडले, सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा केल्यानंतर प्रत्यक्षात या मार्गाचे बांधकाम सूरु झाले. परंतू प्रत्यक्षात सेवा रस्ता सामान्यांसाठी खुला करताना श्रेय लाटणाऱ्या पनवेलच्या भाजपने सामाजिक संघटना व शिवसेनेच्या प्रयत्नांना नजरेआड करून रविवारी स्वताच्या जाहगिरदारीचा कित्ता गिरवत या सेवारस्त्याचा उदघाटनाचा सोहळा रविवारी उरकून घेतला.

विशेष म्हणजे हा रस्ता बंद असल्याने चार वर्षांमध्ये 28 जणांचा बळी रस्ता आेलांडताना गेले आहेत, त्या 28 निष्पापांच्या बळींचे श्रेय सुद्धा भाजपने तेवढ्याचे स्पर्धेने घ्यावे असे प्रतिपादन सोमवारी शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी कामोठे येथे केले. सोमवारी सेनेच्यावतीने भाजप व पीडब्ल्यूडीच्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी सेनेसह, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष, शेकापक्षासह इतर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उदघाटनाचा सोहळा प्रतिनिधीक स्वरूपात पार पाडला.

यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे सल्लागार बबनदादा पाटील, महिला उपजिल्हा संघटक अदीती सोनार, रेवती सकपाळ, दीपक निकम, रामदास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शेकापचे नेते सचिन गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सीटीझन युनिटी फोरम, एकता सामाजिक संघटना यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

17236 Views
Shares 295