Mon. Aug 15th, 2022

29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2 सप्टेंबरला.

’रन फॉर फ्री प्लास्टिक’ चा संदेश देत स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे – महापौर मिनाक्षी शिंदे.

ठाणे, ता. 13 – गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा क्षेत्रात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली 29 वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन यावर्षी 2 सप्टेंबर 2018 रोजी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. ’मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेवून स्पर्धक यंदा मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

विविध अकरा गटात होणाऱया स्पर्धेसाठी एकूण रक्कम रु 7,02,000/- बक्षीसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांची नोंदणी सुरू असून जवळपास 20 हजाराहून अधिक स्पर्धक यात सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाणेकर नागरिकांनीही मोठया संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

रविवार 2 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6.30 वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धा विविध अकरा गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या तीन गटातील स्पर्धा महाराष्ट्र राज्यस्तरावर असून पुरूष 21 कि.मी स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रु. 75,000/ व्दितीय रु. 45000/- तृतीय रु. 30,000/- चौथे रु. 15,000/- अशी आहेत. त्

या शिवाय 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. सदरची स्पर्धा महापालिका भवन चौक येथून सुरू होणार असून याच ठिकाणी समाप्त होणार आहे.

महिला 15 कि.मी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 50,000/- व्दितीय रु.30,000/- तृतीय 20,000/- चौथे रु. 15,000/- अशी असून 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सदरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या ठिकाणी समाप्त होणार आहेत. 18 वर्षावरील मुले (खुला गट) ही 10 कि.मी स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक रु. 25,000/- व्दितीय रु. 20,000/- तृतीय रु 15000/- चौथे रु. 10,000/- असून 5 ते 10 पर्यंतच्या विजेत्यांसाठीही आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ही पारसिकनगर 90 फूट रोड खारेगांव येथून सुरू होणार असून महापालिका भवन चौक येथे समाप्त होणार आहेत. चौथा गट 18 वर्षाखालील मुले 10 कि.मी ही जिल्हास्तरीय स्पर्धा असून या गटातील पहिल्या ते चौथ्या विजेत्यांसाठी अनुक्रमे रु. 25 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. सदरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटो शोरुम, वागळे इस्टेट येथे समाप्त होणार आहे.

ठाणे जिह्यासाठी मर्यादित असलेल्या सर्व स्पर्धांची सुरूवात महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. 15 वर्षाखालील मुलांमुलीसाठी 5 किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या गटातील पहिल्या ते चौथ्या विजेत्यांसाठी अनुक्रमे 8 हजार, 6 हजार, 5 हजार पाचशे, चौथे 5 हजार अशी बक्षीस असून सदरची स्पर्धा मॉसाहेब मिनाताई ठाकरे चौक, उथळसर येथे समाप्त होणार आहे. 12 वर्षाखालील मुलांमुलीसाठी 3 कि.मी ची स्पर्धा असून सदर स्पर्धेसाठी अनुक्रमे 5,500/-, 5 हजार, 4 हजार 500, 3 हजार 500 अशी पारितोषिके असून सदरची स्पर्धा महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे.

ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूष वेगळा गट

ठाणे जिह्यासाठी मर्यादित ज्येष्ठ नागरिक 60 वर्षावरील महिला व पुरूषांसाठी वेगळा गट असून या गटातील पहिल्या पाच विजेत्यांसाठी रोख बक्षीसे आणि मानचिन्ह देण्यात येणार आहेत. महापालिका ते बाटा शोरूम (नितीन कंपनी) अशी अर्धा कि.मीची ही स्पर्धा असणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

रन फॉर फ्री प्लास्टिक

यंदाही 2 कि.मी ची जिल्हास्तरीय ’ रन फॉर फ्री प्लास्टिक ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून येथेच समाप्त होणार आहे.

अवयदानाबाबत जनजागृती

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये अवयदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ज्युपीटर रुग्णालयाचे डॉक्टरही सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी एकूण 238 पंच, 92 पायलट, शेकडो स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक, आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत. सदर स्पर्धेसाठी महापालिकेच्यावतीने विविध सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, स्पर्धेच्या मार्गावर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवा पथके, तात्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रुग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गावर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचार केंद्रे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शिवाय मॉरेथॉन स्पर्धकांसाठी ठाणे परिवहन सेवेतर्फे मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तरी सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होवून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केले आहे.

16684 Views
Shares 128