Mon. Aug 15th, 2022

सिव्हिल हॉस्पिटलवर मनसेच्या महिला आघाडीचा हल्लाबोल.

ठाणे :- ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष सद्यस्थितीत हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकीकडे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरदोर मातांची संख्या जास्त आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात कमी असलेल्या बेडच्या संख्येमुळे अक्षरश: प्रसूतीनंतर मातांसह त्यांच्या नवजात बाळांवर जमिनीवर टाकलेल्या गाद्यांवर उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेडची संख्या वाढविण्याची मागणी होत असताना प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांना घ्यावे की घेऊ नये अशी मनस्थिती तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची झाली आहे.

याचा जाब विचारण्यासाठी मनसे महिला आघाडीतर्फे ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

समीक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून यावेळी मनसेच्या महिला आघाडीने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनास विरोधात जाब विचारला.
महिला प्रसूती कक्षात किमान १०० बेड असावेत असे निवेदन देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेच्या महिला आघाडीने दिला आहे.

3022 Views
Shares 92