Mon. Aug 15th, 2022

गोल्ड’ज जिमच्या 134 व्या शाखेचा ठाण्यातील घोडबंदर रोड येथे शुभारंभ.

ठाणे: जगप्रसिध्द असणार्‍या आंतरराष्ट्रीय फिटनेस चेन गोल्ड’ज जिमचा रविवारी 2 सप्टेंबर 2018 रोजी ठाणे येथे शुभारंभ करण्यात आला. गोल्ड’ज जिम इंडियाच्या सेल्स, ऑपरेशन आणि मार्केटिंग विभाग प्रमुख श्रध्दा शेठ यांच्या हस्ते ठाण्यातील शाखेचा शुभारंभ करण्यात आला. गोल्ड जिमचे संचालक हर्ष गोएंका, श्रध्दा शेठ आणि मिसेस एशिया नवनिधी के. वाधवा यांनी शुभारंभानिमित्त आयोजित बाईक रॅलीला झेंडा दाखवून वातावरणामध्ये एक जल्लोष भरला.

विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणार्‍या शरीरसौष्टवपटुंनी उपस्थितांना आपल्या बलदंड शरीराचे आणि फिटनेसचे विविध पोझेसच्या माध्यमातून दर्शन घडवून उपस्थितांना खूष केले. या अनोख्या शुभारंभ उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

हर्ष गोएंका यांनी महिला खेळाडुंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने धनादेश प्रदान करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

जिमने 30 दिवस आधीपासूनच सदस्यत्व नोंदणी सुरु केली होती. आताच 300 जणांनी आपले सदस्यत्व निश्चित केले आहे. जिममधील व्यायामाचे साहित्य अमेरिकेतील मॅट्रिक्स कंपनीकडून आयात केलेले आहे. जिममधील निष्णात प्रशिक्षक आणि न्युट्रीशनिस्ट तुम्हाला हवे ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतील. दिवसातील व्यायाम संपवल्यानंतर तुम्ही स्पा विभागात आराम करु शकता.

ठाणे शहरात गोल्ड जिमची शाखा सुरु केल्याबद्दल श्रध्दा यांनी संचालकांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “गोल्ड’ज जिम ही नेहमीच सर्वोत्कृष्ट सेवा, अतिशय निष्णात प्रशिक्षक यांच्यासाठी ओळखली जाते. आता या जिमची ठाण्यात शाखा सुरु झाल्यामुळे येथील नागरिकांना तंदुरुस्तीचा नवा मार्ग गवसला आहे. ही परिपूर्णतेची गोष्ट नाही तर प्रयत्नांचा विषय आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी घाम गळेपर्यंत प्रयत्न केल्यानंतर तुमच्या शरीरातील परिवर्तन दिसू लागते. लोक आता तंदुरुस्त शरीराकडे गांभीर्याने पाहत आहेत आणि त्यांना गोल्ड’ज जिमच्या माध्यमातून आपले फिट बॉडीचे स्वप्न साकारण्याची भरपूर संधी मिळेल.”

ठाणे गोल्ड’ज जिमचे संचालक हर्ष गोएंका यांनी सांगितले की, ‘‘तंदुरुस्तीचा ध्यास घेतलेल्या जगभरातील लोकांसाठी गोल्ड’ज जिम हे सर्वोत्तम फिटनेस ठिकाण असते. या ठिकाणी उपलब्ध साहित्यसामग्री आणि परिणाम इतर कोठेही मिळू शकणार नाहीत. ही जिम म्हणजे माझ्या ध्येयाच्या मार्गातील खूप महत्वाचा टप्पा आहे. येथे आल्यानंतर नेहमीच माझ्यात निश्चयी आणि स्फुर्तीची भावना जागृत होते, जी आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करते. येथे इतर लोकांना मेहनत करताना पाहिले की मलाही तसे करण्याची उर्जा मिळते. प्रत्येक वेळी आणखी पुढे जाण्यासाठी एकच कारण पुरेसे ठरते तर पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी हजारो कारणे काम करत असतात. जिममधील एकूण वातावरणच समाधानकारक असून येथील सर्व सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. ही जिम किफायतशीर मोबदल्यात सर्वांचे स्वागत करत असून समाजाची तंदुरुस्तीची मोठी गरज भागवण्याचे काम करत आहे. मला आशा वाटते की, येथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे तंदुरुस्तीचा प्रवास सुरु करुन फिटनेसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही जिम सर्वोत्तम वातावरण आणि अनुभव प्रदान करेल.”

आहाराबाबतच्या मानसशास्त्राच्या प्रशिक्षक, प्रसिध्द फूड आणि न्यूट्रिशन प्लॅनर तसेच एनएलपी आणि मेडिटेशन तज्ञ असणार्‍या मिसेस एशिया नावनिधी के. वाधवा यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मानवी जीवनात श्वसन क्रियेइतकेच तंदुरुस्तीलाही फार महत्व आहे. तंदुरुस्तीच्या मार्गावर पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक गुरुची प्रत्येकाला नेहमीच गरज भासत असते. गोल्ड’ज जिम ही केवळ जिमची एक चेन नाही जिथे तुमच्या शारीरिक क्षमतेचा विचार न करता कठोर व्यायाम करण्याची सक्ती केली जाते. इथे येउन मी खूप रोमांचीत झाली आहे. गोल्ड’ज जिम आणि हर्ष गोएंका यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या भरपूर शुभेच्छा आहेत.”

गोल्ड’ज जिमविषयी थोडेसे.

वर्ष 2017 मध्ये गोल्ड’ज जिम इंडियाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वैभवशाली 15 वर्षाच्या इतिहासात गोल्ड’ज जिमने सर्वोत्कृष्टतेसाठी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. गोल्ड’ज जिमने फिटनेस उद्योगातील सर्वोत्तम केंद्र बनण्यासाठी सर्व नवीनतम व्यायाम उपकरणे आणि सेवांच्या माध्यमातून आपल्या फिटनेस प्रोफाइलचा विस्तार केला आहे. प्रमाणित प्रशिक्षक आणि पौष्टिक अन्नपदार्थ समुपदेशनासह, गोल्ड’ज जिम आपल्या सदस्यांसाठी आरोग्य व कुशलतेला व्यापक दृष्टिकोन पुरवितो. तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देण्यासाठी गोल्ड’ज जिम आपल्या प्रतिष्ठेस अनुकूल असे काम करते. मग तुमचे ध्येय चरबी, टोन कमी करणे किंवा स्नायू जोडणे, सामर्थ्य वाढविणे, लवचिकता वाढवणे किंवा आपल्या हृदय व रक्तवाहिन्या सुधारणे असे काहीही असो. केवळ गोल्ड’ज जिममध्ये तुम्हाला अनुकूल असे वातावरण आणि अनुभव उपलब्ध होईल.

जगभरातील वेगवेगळ्या वयोगटातील सेलिब्रिटीज, क्रीडापटू, बॉडीबिल्डर्स, कॉरपोरेट हेड आणि फिटनेस उत्साही यांच्या पसंतीची जिम म्हणजे गोल्ड’ज जिम. ही जिम लोकांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतेला साहाय्य करून त्यांचे जीवन बदलत आहे. गोल्ड’ज जिमने आपल्या संपूर्ण फिटनेस प्रोफाइलचा विस्तार केला आहे, ज्यामुळे येथे उद्योगांमध्ये सर्वोत्तम ठरणारी नवीन व्यायाम साधने आणि सेवा पुरवते. प्रमाणित प्रशिक्षक आणि पौष्टिक समुपदेशनासह, गोल्ड’ज जिम आपल्या सदस्यांना आरोग्य व कुशलतेला व्यापक दृष्टिकोन पुरवते. तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देण्यासाठी गोल्ड’ज जिम आपल्या प्रतिष्ठेस अनुकूल असे काम करते.

जिमचा पत्ता :- २रा मजला , दोस्ती इम्पेरिया , मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे.

दूरध्वनी क्रमांक :- 9326161166, 9326397962.

51350 Views
Shares 109