Sun. Dec 4th, 2022

उद्या काँग्रेसचा भारत बंद. मनसे पूर्ण ताकदीने बंद मध्ये सहभागी होणार.

मुंबई : पेट्रोल, डिझेलची केंद्र सरकारने केलेली प्रचंड दरवाढ आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला असून,या बंद मध्ये सक्रिय सहभाग दर्शविला आहे.

पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर आणि गगनाला भिडलेली महागाई,याचा निषेध म्हणून काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस, उपाध्यक्ष व विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसे उद्या पूर्णपणे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

उद्याच्या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सामील व्हा पण सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

21154 Views
Shares 199