Tue. Jul 7th, 2020

फायनान्स कंपनीच्या २ संचालकांच अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव पोलिसांनी उधळला.


ठाणे (१०) प्रतिनिधी :- (राजन सावंत)
एका व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी राजस्थानमधील दोघांचे अपहरण करणाऱ्या लेनीन कुट्टीवट्टे, रोहित शेलार, ओमप्रकाश यादव, अभिषेक झा, सागर साळुंखे आणि मुंबईतील पोलीस तुकाराम सुदगे या सहा जणांना ठाणे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

लेनिन मुरली कुट्टीवटे (40) राहणार कोळसेवाडी कल्याण मूळचा केरळाचा हा एक वर्षापूर्वी उदयपुर येथे एका फायनान्स कंपनी मध्ये कामाला होता. तिथे तिरुपती फायनान्स निधी लिमिटेड या कंपनीचा मालक देवानंद याच्याशी काही कारणास्तव भांडण झाल्यानंतर लेनिन हा कल्याणला परत आला होता.

त्या नंतर दहा दिवसांपूर्वी लेनिन याने ओमप्रकाश जैस्वाल ( 23) याला देवानंद च्या फायनान्स कंपनीला लोन साठी अर्ज करायला सांगितले. आमची ठाण्याला मोठी प्रॉपर्टी आहे ती डेव्हलप करण्यासाठी 10 करोड रुपये हवेत. तेव्हा दयानंद याने प्रॉपर्टीचे सगळे पेपर पाठवा असे सांगितले. तेव्हा ओमप्रकाश याने तुम्ही इथे येऊन जागा पण बघा आणि पेपर सुध्दा तपासा असे त्यांना सांगितले. त्या प्रमाणे दयानंद हा रोनक ह्या आपल्या नोकरा बरोबर उदयपुर येथुन ठाण्याला प्रॉपर्टी बघायला आला. ठाण्याला पोहचल्या वर अशोक टॉकीज च्या बाजुला येऊन उभा राहिला. तिथे ओमप्रकाश जैस्वाल भाड्याने ओला गाडी घेऊन आला आणि त्यांना घेऊन डोंबिवली येथे सागर साळवे यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेला. तिथे लेनिन उपस्थित होता. त्याने त्यांना दमदाटी करून मारहाण केली आणि तलवार लाऊन ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे घाबरलेल्या देवानंद याने आपल्या उदयपुरच्या ऑफिस मध्ये फोन लाऊन त्याच्या पार्टनरला आम्हाला किडनँप केल आहे. आमच्या कडे एक करोड रुपयाची खंडणी मागत आहेत आणि नाही दिल्यास ठार मारण्याची धमकी देत आहेत असे सांगीतले. त्यानंतर लेनिन याने त्याच्याच फोनवरून फोन करून परत धमकी दिली. तेव्हा त्याच्या पार्टनर ने येवढे पैसे एका दिवसात कुठून आणणार जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये देऊ शकतो असे सांगितले. तेव्हा लेनिन याने पंचवीस लाख रुपये लगेच पाठवा नाहीतर या दोघांना ठार मारु असे सांगीतले.

त्या प्रमाणे उदयपुर येथुन रात्री दोन वाजता क्रुष्णा नावाचा त्यांचा माणुस 25 लाख रुपये घेउन ड्रायव्हर व इनोव्हा गाडी घेऊन निघाला. काल दुपारी फाउंटन हॉटेल येथे पोहचले असता तिथुन त्यांना ठाण्यात बोलवले नंतर कल्याणला बोलवले. कल्याण येथे दुर्गाडी किल्ल्याच्या रोडवर एका चेव्हरेट MH-O4 DK 0986 ह्या नंबरची गाडी घेऊन लेनिन देवानंद ला घेऊन तिथे पोहचला. इनोव्हा मधुन 25 लाख रोख आणि क्रुष्णाला आपल्या गाडी मध्ये घेतले आणि इनोव्हाच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन निघुन जाण्यास सांगीतले.

इनोव्हाच्या ड्रायव्हर ला परिस्थितीच़ गांभीर्य समजले आरोपी पैसे घेउन गेले व आपल्या माणसांना सुध्दा सोडले नाही तेव्हा ड्रायव्हरने घाबरून जाऊन आपल्या बोरीवलीच्या ओळखीच्या ईसमाला फोन लावला. सगळी हकीकत सांगितली व आपल्या कडे गाडीचा नंबर असल्याचे सांगीतले , त्या इसमाने लगेच ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना माहीती दिली. खंडणीचे एक पथक अगोदरच एका तपासा साठी कल्याण येथे गेले होते. ते पत्री पुलाच्या अगोदर रोडवर उभे होतेच. त्यांना माहीती मिळताच त्यांनी सापळा लावला त्या वेळी एपीएमसी मार्केट कल्याण येथे वरील क्रमांकाची सफेद रंगाची शेवर्लेट गाडी दिसुन आली. त्यांनी ती गाडी पाठलाग करून पकडली व गाडीतील देवानंद व क्रुष्णा व 25 लाख रुपये असे ताब्यात घेतले. लेनिन ला ताब्यात घेतल्या नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या कडे चौकशी केली असता रोनक याला त्यांनी लेनिनच्या घरी बांधून ठेवले होते. पोलिसांनी त्यांची सुटका केली. आदल्या रात्री त्यांनी देवानंद व रोनक यांच्या गळ्यातील चैन आणि अंगठी काढून घेतली होती. त्या दोघांच्या एटीएम मधुन 70 हजार रुपये काढून घेऊन सगळ्यांनी वाटुन घेतले होते. त्या मध्ये सागर साळवे याने पुढाकार घेतला होता. या गुन्ह्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे असे उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

855 Views
Shares 107