Wed. Mar 29th, 2023

खजिन्यात सापडला गणपती !!

कोणीही चकित होईल अशी काही खास हि खजिन्याची
इको फ्रेंडली सजावट केली आहे समतानगर मधील जोशी कुटुंबीयांनी !!

जोशी परिवाराच्या घरी गणपती बसवण्याचे हे ५८ वे वर्ष आहे . पुठ्ठा -हॅन्डक्राफ्ट पेपर व घरातील रोजच्या वापरातील माळांचा वापर करून सुंदर अशी ‘खजिन्याच्या पेटीतुन बाहेर येणारा गणपती’ असा अप्रतिम देखावा साकारण्यात आला आहे , त्याबरोबरच देवाला ठेवण्यात येणारे विड्याचे पान सुद्द्धा हे दोऱ्याने विणलेले आहे .

खजिन्यामधे पुरातन काळातील वेगळ्या वेगळ्या राजांची नाणी वापण्यात आली आहेत. जवळ जवळ २००० नाणी आणि ही सर्व नाणी पुठ्ठयाची आहेत . ती पण घरी बनवलेली ! आणि ह्या सर्व गोष्टीला खर्च आला फक्त १००० रुपये .

कोणाचेही मन मोहून घेईल असा हा देखावा साकारण्यासाठी जोशी कुटूंबातले १२ जण जवळजवळ ८ दिवस मेहनत घेत होते , पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा एक सुंदर संदेश जोशी परिवाराने दिलेला आहे .

71163 Views
Shares 494