Wed. Mar 29th, 2023

भाजपच्या इंडिया शायनिंग संकल्पनेवर आधारित सजावट !!

घोडबंदर येथील पाटील कुटुंबियांची राजकीय तोऱ्यात मोहक सजावट !!
घोडबंदर रोड येथील पाटील परिवाराने कलेचा एक अविस्मरणीय असा नजारा सादर केला आहे.

पुठ्ठा , कागद, quelling चा वापर करून सुंदर असे कमळ व पिरॅमिड उभारले आहे , यामध्ये विविध रंगांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आलेला आहे .

पाटील कुटुंबियांच्या मते कमळ हे खास भाजप या राजकीय पक्षाला २०१९ च्या निवडणुकांमध्ये पाठिंबा देण्यासाठी दाखवले गेले आहे आणि पिरॅमिड मध्ये जे रंग वापरले आहेत ते भाजपच्या
कार्यामुळे भारत जगामध्ये चमकत राहो इ. त्यांची यामागे संकल्पना होती .

गणेश मूर्तीच्या मागे पण काळ्या पेपर ला दुमडून म्हणजे चुरा करून त्यामधून साकार होणाऱ्या आकारामधूनच गणपतीचे मुख बनवण्यात आलेलं आहे .
पाटील कुटुंबीय यासाठी गेले २ महिन्यांपासून विचारविनिमय करत होते. ८ ते १० दिवस मेहनत घेत होते , नोकरी वरून आल्यानंतर परिवारातील सदस्य हा देखावा करत होते .पाटील कुटुंबियांचे गणपती बसवण्याचे हे ५७ वे वर्ष आहे .

32388 Views
Shares 87