Mon. Oct 3rd, 2022

साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मी ठाण्यात अवतरली !!

ठाणे (राजन सावंत) :-
ठाणे पूर्व भागातील चेंदनी कोळीवाडा येथील लक्ष्मी वाडीतील सिनलकर कुटूंबाने एक अनोखा असा गणेशोत्सव साजरा केला आहे. गेली ६ वर्ष हा परिवार गणपती शाडूची मूर्ती आणत असून या गणपतीचे विसर्जनही इको फ्रेंडली पद्धतीने करतात . गणपती मूर्तीचे विसर्जन एका मोठ्या भांडयात केले जाते आणि त्याच मातिचा वापर पुढल्या वर्षीच्या गणेशाची मूर्ती बनवण्यासाठी केला जातो. सिनलकर कुटूंबाचा दरवर्षी एकच पर्यंत असतो की पर्यावरण मुक्त असे उत्सव साजरे करावे. आपल्या उत्सवातून लोकांनी पर्यावरणाशी समतोल राखावा हि इच्छा सिनलकर कुटूंब गणपती चरणी करतात.


घरात गणपतीची स्थापना करण्यासाठी जागा कमी असल्याने तब्बल १३ घरं मिळून हा गणपती बसवितात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
सिनलकर कुटूंबाने यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे हुबेहूब मूर्तीचे रूप साकारले आहे. संपूर्ण मूर्ती ही कागदाचा लगदा आणि माती पासून बनवण्यात आली आहे. गणपतीची आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती हि दोन ते अडीच फुटाची आहे. महालक्ष्मीचे मुकुट हे सूतळ आणि कागदाच्या लगदा पासून बनवण्यात आले आहे. मूर्ती सजवण्यासाठी त्यावर मोती आणि हिरे यांचा वापर केला आहे. मूर्तीचे हुबेहूब रूप साकारण्यासाठी १ महिन्याचा कालावधी लागला. विशेष म्हणजे ह्या मूर्तीचे शिल्पकार का ओंकार फापाळे हा अवघ्या २० वर्षाचा आहे. ओंकार सापळे हा ठाणे स्कूल ऑफ आर्ट मध्ये फाईन आर्टचे शिक्षण घेत आहे.

#गणपतीबाप्पामोरया
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल शतशः धन्यवाद!

#घरगुतीगणेशोत्सवसजावटस्पर्धा२०१८ #Thane #ThaneLive

34435 Views
Shares 165