Wed. Mar 29th, 2023

ठाणे :-
ठाण्यातील बागुल कुटुंबीयाने आजची गणेशोत्सवाची आणि समाजाची परिस्थिती बघता गणपती बाप्पाला काय वाटत असेल आणि तो काय मागत असेल या विषयावर #मीगणपतीबोलतोय असा देखावा सादर केला आहे.

“जात, धर्म , पंत यामध्ये देशाने न विखुरले जाता , आपल्या वैविधेतीची वज्रमूठ बनवून एकता अखंड ठेवावी ” हा संदेश ठाण्याच्या “बागुल” परिवाराने देऊन देखाव्यामधून पर्यावरण संदेशाची साद घातली आहे .

गणपती पारंपरिक पद्धतीने बसविला पाहिजे, देवाला मंडळांच्या नावांमध्ये विखुरले गेले नाही पाहिजे , देवाची खरी ओळख मंडळांच्या स्पर्धेमध्ये पुसली गेली नाही पाहिजे. यमाझी म्हणजेच गणपतीची मूर्ती ही छोटी असली तरी चालेल पण शाडूची असावी, जेणे करून तिचे विसर्जन लगेच होईल , विसर्जनाच्या दिवशी मूर्ती अक्षरशः ढकलून दिली जाते आणि ती समुद्राच्या कचऱ्यात पडलेली असती , हे टाळायचे असेल तर गणेशोत्सव एको फ्रेंडली साजरा करा व पर्यावरण टिकवा हा संदेश ह्या देखाव्यातून दिला गेला आहे.

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल शतशः धन्यवाद!

#घरगुतीगणेशोत्सवसजावटस्पर्धा२०१८
#गणपतीबाप्पामोरया #Thane #ThaneLive

70057 Views
Shares 74