Wed. Mar 29th, 2023

ठाणे (राजन सावंत) :-
गणपती बाप्पा एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते. असाच थाट परदेशींच्या घरातील बाप्पाचा आहे . कोण बोलतो नवसाला पावणार बाप्पा वेगळा असतो मनापासून श्रद्धा असेल तर बाप्पा सर्वांची इच्छा पूर्ण करतो.

सार्वजनिक असो किंवा घरगुती प्रत्येकालाच आपल्या बाप्पाचा देखावा हा सुंदर, सुबक आणि इतरांपेक्षा वेगळा करायचा असतो. ठाण्यामध्ये मध्ये रहाणारे परदेशी कुटुंब त्यापैकीच एक, दरवर्षी राजेंद्र परदेशी घरातच बाप्पासाठी आगळीवेगळी सजावट करत असतात. लाडक्या गणरायासाठी दरवर्षी जागा सजविण्याकरिता त्यांचे मित्र अशोक पाटील हे नवनवीन कल्पना वापरतात.

आपल्याच बाप्पाची सजावट कशी भारी दिसेल याचा विचार करता करता असा एक उपाय शोधून काढला कि आपण जी सजावट करणार आहोत त्या मातीत याचे विघटन कसे लवकरात लवकर होईल. त्यासाठी त्यांनी सूतळ आणि गोनीचा वापर करून सुदंर मखर तयार करण्यात आला. सर्वात आधी सूतळचा वापर करून फुलं , पानं तयार करण्यात आली. ६ फुटाचा सुंदर असा देखावा उभारण्यात आला त्यांच्या मध्यभागी पाण्याचे फाऊंटन तयार करण्यात आले. देखाव्याच्या मधोमध स्थापन केलेली बाप्पाची मूर्ती सर्वांनाच आकर्षित करत आहे. या सजावटीमध्ये करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने गणपती बाप्पाचे रूप मोहक दिसत आहे.

ठाणे लाईव्ह शी बोलताना अशोक पाटील म्हणाले सध्या पर्यावरणाला पूरक अशी मूर्ती आणि सजावट याकडे आमचा कल जास्त असतो आणि हे एकाअर्थी चांगले आहे कारण, सण साजरे करून प्रदूषणात भर टाकणे वाईटच. सृजनतेची आद्य देवता असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काही इको-फ्रेंडली आणि घरगुती सजावट पण पर्यावरण मुक्त असेल तर खूप चांगले असाच विचार आपण सर्वानी करावा

गणपतीच्या चरणी लीन होत, त्याच्या भक्तीत तल्लीन होत, त्याच्या रूपात एकरूप होत, त्याच्या ठायी असलेला एकतरी गुण आपल्याला स्पर्शून जावा आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचे सार्थक व्हावे या पेक्षा दुसरं काय मागू याच्याकडे ? !! गणपती बाप्पा मोरया !!


स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल शतशः धन्यवाद!

#घरगुतीगणेशोत्सवसजावटस्पर्धा२०१८ #
#गणपतीबाप्पामोरया #Thane #ThaneLive

31110 Views
Shares 42