Wed. Mar 29th, 2023

निसर्गाचे रक्षण म्हणजेच स्वतःचे रक्षण :- नितीन लांडगे

ठाणे (राजन सावंत) :-

मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला कसे काय जगता येईल? निसर्गावर प्रेम करा, त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहयोग करा असा संदेश महाराष्ट्र कार्यकारिणी विस्तारक युवासेना आणि युवासेना ठाणे शहर अध्यक्ष नितीन लांडगे यांनी आपल्या देखाव्यातून दिला आहे.

ठाणे लाईव्ह शी बोलताना ते पुढे म्हणाले की युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नेहमीच #BeRealNotPlastic आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करा असा संदेश दिला आहे. त्यांचेच अनुकरण आम्ही युवासैनिक करत आहोत. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही. ज्या प्रमाणात वुक्ष तोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा र्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे.

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. जंगलतोड तर थांबलीच पाहिजे; पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत. त्यांची योग्य निगा राखून ती योग्य प्रकारे वाढतील याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षारोपण करा, तसेच वृक्षांचे रक्षण करा.

आपण सर्वानी गणपती चरणी प्रार्थना करूया ह्या मानवाला जगलं तोडीपासून लांब ठेव , निसर्गाचे सौदर्य जपण्यास मानवाला सदबुद्धी देवो.

49109 Views
Shares 104