Wed. Mar 29th, 2023

ठाणे (राजन सावंत)
विनोदकुमार जाजू यांनी यावर्षी आत्महत्या हा विषय घेऊन जनजागृती केली आहे. वेगवगळ्या कारणांतुन होणारी आत्महत्या ही कशी रोखली जाईल असे चलचित्रांतून दाखविण्यात आले आहे.

अनमोल असे मानवी.. जीवन भगवंताच्या कलाकुसरीने बनवलेले मानवी जीवन .. ८४ लक्ष योनी प्रवासा नंतर मिळालेले मानवी जीवन.. आजच्या मानव खूप प्रगतशील आहे आपल्या हुशार बुद्धिमतेनी चंद्रावर जाणारा हा मानव पण तो आत्महत्या का करतो??

मानव वेगवगळ्या मार्गातून आत्महत्या करतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनात जीवन कसे जगायचे हेच त्याला कळत नाहीये. आजचं जीवन स्पर्धात्मक झालेले जीवनात यश अपयश याने भयभीत झालेले आहे. शिक्षण , व्यवसाय , नोकरी , घराचे विचार यांनी तो पूर्ण घेरलेला आहे . यातूनच निर्माण होणारे ताणतणाव , नैराश्य , मानसिक कमकुवतपणा , याची परिणीती म्हणजे जीवनाचा अंत….

आत्महत्या. पण आत्महत्या हा काही उपाय आहे का .. परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून होणारी आत्महत्या , सोशल मीडियाच्या आहारी जाऊन होणारी आत्महत्या , प्रेमभंगामुळे होणारी आत्मह्त्या , नोकरी नाही मिळत म्हणून होणारी आत्महत्या , कुटूंबातून होणारी मानसिक कुचुंबनांना , कर्जातून होणारी शेतकऱ्याची आत्महत्या ह्या गोष्टी रोखायला पाहिजे.

चलातर गणपती बाप्पा ला सांगूया आम्हाला सुबुद्धी दे आत्मह्त्या हा पर्याय नाही… परिस्थिती वर मात करणे , लढणं , जिकनं , एक स्वप्न तुटलं तर दुसरं रंगवणं… गरज आहे ती या सकरात्मक ऊर्जेची ही ऊर्जा गणपती बाप्पा सर्वाना दे.

58617 Views
Shares 97