Wed. Mar 29th, 2023

ठाणे (राजन सावंत) :-
गणपतीच्या विविध रूपातील देखण्या मूर्ती असतात. सिंहासनारूढ, कमळ, उंदरावर बसलेला गणपती तसेच विविध भावमुद्रांमध्ये गणेशाच्या मूर्ती तयार केल्या जातात. काहींना मोठी तर काहींना लहान मूर्ती आवडते. पण या आवडीनिवडी पलीकडे जाऊन मूर्तिकार आपल्याच घरातील मूर्ती कशी बनवत असेल असा प्रश्न सर्वांचं पडत असेल …

ठाण्यातील नांदिवकर कुटूंब त्यापैकी एक आहे. गेली २५ वर्ष मूर्ती बनवण्याचे काम करतात . ‘माझे वडील मूर्तिकाम करतात . अगदी लहानपणापासून त्यांना मूर्ती घडविताना बघत आलो आणि बघता बघता मूर्ती स्वतः बनवयाला शिकलो असे समीर नांदिवकरांनी सांगितले.

नांदिवकर कुटूंबाने यावर्षी टूथपेस्ट , अंगाचा साबण , शाम्पू, पावडरचे डबे , टूथब्रश या वस्तूने मखर बनवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना २६२ टूथपेस्ट , ४० अंगाचा साबण , ८ शाम्पू, ६२ पावडरचे डबे , ६ टूथब्रश यांचा वापर करण्यात आला . त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सुंदर उत्तर दिले. आपण गणपती बाप्पा साठी थर्माकॉल , प्लस्टिक , लाकूड , पेपर यांच्या साहाय्याने देखावा बनवतो पण बाप्पा चे विसर्जन झाल्यावर कचरा पेटीत किंवा तलावात टाकून देतो. आपण असा मखर बनवावा कि त्या पासून कोणाला तरी मदत होईल. म्हणून नांदिवकर कुटूंब गरजेच्या वस्तूंच देखावा तयार केला. बाप्पाचे विसर्जन झाल्यावर ह्या सर्व वस्तू अनाथ आश्रमला देतात.

गणपती बाप्पाची वेगळ्या रूपातील मूर्ती घडविण्याबरोबरच एका कुटुंबाची परंपरा आपल्याकडून जपली जात आहे याचा आनंद समीर नांदिवकरांनी व्यक्त केला .

37796 Views
Shares 26